Champions Trophy 2025 : ‘हायब्रीड मॉडेल’ म्हणजे नेमकं काय? भारत, पाकिस्तान दरम्यानचे आयसीसी सामने कसे खेळवणार?

Champions Trophy 2025 : भारत पाकिस्तान दरम्यानचे सामने आता त्रयस्थ ठिकाणी होणार

48
Champions Trophy 2025 : ‘हायब्रीड मॉडेल’ म्हणजे नेमकं काय? भारत, पाकिस्तान दरम्यानचे आयसीसी सामने कसे खेळवणार?
Champions Trophy 2025 : ‘हायब्रीड मॉडेल’ म्हणजे नेमकं काय? भारत, पाकिस्तान दरम्यानचे आयसीसी सामने कसे खेळवणार?
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचे बिघडलेले राजकीय संबंध बघता, दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या आयसीसी स्पर्धा हायब्रीड पद्धतीने भरवण्याचा निर्णय आयसीसीने गुरुवारी जाहीर केला. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकाची अनिश्चितता संपली आहे. आणि दोन्ही देश इथून पुढे त्रयस्थ ठिकाणीच खेळतील हे स्पष्ट झालं आहे. आपल्या पत्रकात आयसीसीने म्हटलंय की, ‘२०२४ ते २७ दरम्यान आयसीसीच्या ज्या स्पर्धा भारत किंवा पाकिस्तानमध्ये होतील, त्यात या दोन देशांमधील सामने त्रयस्थ ठिकाणी होतील.’ यालाच ‘हायब्रीड मॉडेल’ असं म्हणतात. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- ‘जाणीवपूर्वक तपासास विलंब करत आहात का?’ Akshay Shinde encounter प्रकरणी हायकोर्टाचा CID ला सवाल)

एखाद्या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या आणि खेळण्यासही पात्र असलेल्या सर्व देशांना एखाद्या स्पर्धेत सहभागाची संधी मिळावी यासाठी या मॉडेलचा वापर होतो. शिवाय जर दोन देशांमधील राजकीय संबंध बिघडलेले असतील, तर क्रीडाविषयक संबंध बिघडू नयेत यासाठी मॉडेलचा उपयोग होतो. आणि भारत – पाकिस्तानच्या बाबतीत तेच झालं आहे. (Champions Trophy 2025)

२०२७ पर्यंत होणाऱ्या ३ आयसीसी स्पर्धांमध्ये हेच मॉडेल वापरण्यात येईल. (Champions Trophy 2025)

 हायब्रीड मॉडेलमध्ये स्पर्धेचं यजमानपद मूळ यजमानांकडे कायम ठेवून काही विशिष्ट संघांचे सामने यजमान देशाव्यतिरिक्त इतर देश किंवा देशांमध्ये हलवले जातात. यामुळे विरोध असलेला देशही स्पर्धेत खेळू शकतो आणि मूळ यजमानांचं यजमानपदही हिरावून घेतलं जात नाही. मुख्य यजमान आणि आयसीसी यांच्या संगनमताने इतर यजमान देश ठरवले जातात. (Champions Trophy 2025)

आताच्या हायब्रीड मॉडेलमध्ये भारत आणि पाकिस्तानचे सामने त्रयस्थ ठिकाणी हलवण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी झालेल्या आशिया चषकात हे मॉडेल वापरण्यात आलं होतं. संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्ये पार पडली. पण, भारतीय संघाचे ४ सामने श्रीलंकेत खेळवण्यात आले. आयसीसीच्या सर्व सदस्य देशांमध्ये क्रिकेटविषयक सलोखा कायम राहावा आणि सदस्यांना स्पर्धेत सहभागी होता यावं यासाठी हे मॉडेल आखण्यात आलं आहे. (Champions Trophy 2025)

(हेही वाचा- Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकात भारताचे सामने त्रयस्थ ठिकाणीच होणार, आयसीसीने केलं स्पष्ट)

सामन्याच्या आयोजनाबरोबरच त्यातून मिळणारा नफा सह यजमानांबरोबर वाटून घेतला जातो. आणि एकूण स्पर्धेच्या नफ्यातील मोठा हिस्सा मूळ यजमानांना दिला जातो. त्यामुळे यजमान देशालाही काही प्रमाणात नुकसान भरपाई मिळते. (Champions Trophy 2025)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.