Champions Trophy : काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मावर टीका करताच भाजपा आणि बीसीसीआयचे सडेतोड उत्तर !

94
Champions Trophy : काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मावर टीका करताच भाजपा आणि बीसीसीआयचे सडेतोड उत्तर !
Champions Trophy : काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहित शर्मावर टीका करताच भाजपा आणि बीसीसीआयचे सडेतोड उत्तर !

चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) स्पर्धेत भारताने रविवारी (२ मार्च) न्यूझीलंडचा (Ind vs NZ) पराभव करत उपांत्य फेरीत एन्ट्री केली आहे. भारताच्या या विजयानंतर क्रिकेट चाहत्यांकडून भारतीय संघाचे कौतुक होत आहे. यातच आता काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद (Shama Mohammed) यांनी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) शरीरावर केलेली एक टिप्पणी वादाच्या केंद्रस्थानी आहे. ज्यावर आता भाजपाकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. (Champions Trophy)

रोहित शर्माच्या फिटनेसवरून आजवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र त्याचा त्याच्या खेळावर कधीही दुष्परिणाम दिसला नाही. शमा मोहम्मद यांच्या टीकेनंतर आता क्रिकेट चाहते आणि भाजपाचे प्रवक्ते जोरदार प्रत्युत्तर देत आहेत. शमा मोहम्मद यांनी म्हटले होते, “रोहित शर्मा खेळाडू म्हणून खूप जाड असून त्याला वजन कमी करण्याची गरज आहे. तसेच तो भारताचा आतापर्यंतचा सर्वात वाईट कर्णधार आहे.” (Champions Trophy)

ट्विट डिलीट
रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे, अशी एक्स पोस्ट अब्दुल गफार नामक युजरने केली होती. या पोस्टला उत्तर देताना शमा मोहम्मद यांनी प्रश्न विचारला, “रोहित शर्मामध्ये जागतिक दर्जाचे असे काय आहे? त्याचे पूर्वसुरी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, विराट कोहली, कपिल देव, रवि शास्त्री आणि इतरांकडे पाहा. त्यांच्या तुलनेत रोहित शर्मा एक साधारण कर्णधार आणि तितकाच सामान्य क्रिकेटपटू आहे. त्याला नशीबाने कर्णधार पदाची संधी मिळाली.” व्हायरल झाल्यानंतर आणि नंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर, शमा मोहम्मदने हे ट्विट डिलीट केले. (Champions Trophy)

बीसीसीआयचे सडेतोड उत्तर
भारतीय संघ एक मोठा सामना खेळणार असताना शमा मोहम्मदने ही पोस्ट केली आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या विधानाचा तीव्र निषेध केला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी म्हटले की, ‘संघ एका महत्त्वाच्या स्पर्धेच्या मध्यभागी असताना, एका जबाबदार व्यक्तीने अशा क्षुल्लक टिप्पण्या करणे हे खूप दुर्दैवी आहे. याचा संघावर आणि खेळाडूंवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, कृपया अशा टिप्पण्या करू नका.’ (Champions Trophy)

भाजपचे प्रत्युत्तर
क्रिकेट चाहत्यांसह भाजपाने शमा मोहम्मद यांच्या विधानाचा निषेध केला आहे. त्यांनी क्रिकेटपटूच्या शारीरिक व्यंगावर भाष्य केले असून टी-२० विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधाराचा अवमान केला आहे, अशी टीका भाजपाच्या नेत्या राधिका खेरा यांनी केला. काँग्रेसकडून अनेकदा खेळाडूंचा अवमान करण्यात येतो, असेही त्या म्हणाल्या. खेरा पुढे म्हणाल्या, रोहित शर्माने भारताला विश्वचषक जिंकून दिला. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वतःच्या पक्षाला विजय मिळवून देऊ शकलेले नाहीत. तसेच खेरा यांनी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांच्यावरही टीका केली. भारताची मान उंचावणाऱ्या क्रिकेटपटूंना लक्ष्य करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस पक्षाची कमी होत चाललेली विश्वासार्हता जपण्यावर लक्ष केंद्रीत करावे. (Champions Trophy)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.