- ऋजुता लुकतुके
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवीन अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी अध्यक्षपदाची सूत्र हातात घेतल्यानंतर चॅम्पियन्स करंडकातील भारताचा सहभाग हा मुद्दा तडीस नेण्याचं ठरवलं आहे. पुढील आठवड्यात दुबईत होणाऱ्या आयसीसी बैठकीत ते बीसीसीआयशी या मुद्यावर बोलणार आहेत. त्यांना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याकडून सहभागाची हमी हवी आहे. (Champions Trophy Cricket)
२०२५ मध्ये आयसीसीची ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये प्रस्तावित आहे. पण, बीसीसीआयने अजून स्पर्धेसाठी पाकिस्तानला खेळाडूंना पाठवण्याची परवानगी दिलेली नाही. आणि आतापर्यंतची बीसीसीआयची भूमिका पाहता सहभाग अजूनही अनिश्चितच आहे. (Champions Trophy Cricket)
गेल्यावर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेतही भारताने पाकिस्तानमध्ये न खेळण्याचीच भूमिका घेतली होती. त्यामुळे भारताचे सामने ऐनवेळी श्रीलंकेत हलवावे लागले होते. अगदी भारत-पाक सामनाही श्रीलंकेत घ्यावा लागला. यामुळे पाक क्रिकेट बोर्डाचं या स्पर्धेच्या आयोजनात आर्थिक नुकसानही झालं होतं. (Champions Trophy Cricket)
(हेही वाचा – Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाचा एसबीआयला दणका! न्यायालयाने फेटाळली निवडणूक रोख्यांवरील याचिका)
त्यामुळे चॅम्पियन्स करंडकात पाकिस्तान बोर्डाला भारताकडून सहभागाची हमी हवी आहे. मोहसीन नकवी दुबईत आयसीसी आणि बीसीसीआयबरोबरही या विषयावर चर्चा करणार आहेत. पण, चॅम्पियन्स स्पर्धा पुढील वर्षी मार्च महिन्यात असल्यामुळे बीसीसीआय आताच पाकला अशी हमी देईल अशी शक्यता नाही. (Champions Trophy Cricket)
‘इतर सर्व संघांनी चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानला संघ पाठवायचं मान्य केलं आहे. तर पाकिस्तान बोर्डाने गेल्यावर्षी एकदिवसीय विश्वचषकासाठी पाक संघ भारतात पाठवला होता. आपली बाजू मांडताना पाकिस्तानकडून हे मुद्दे पुढे केले जातील,’ असं पाक बोर्डातील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं आहे. (Champions Trophy Cricket)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community