
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात (Champions Trophy Final 2025) भारताचा सामना न्यूझीलंडशी (IND Vs NZ) होत आहे. या सामन्यातील नाणेफेक (toss) भारताने हारला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायलनमध्ये रोहितसाठी नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे होते. (Champions Trophy Final 2025)
हेही वाचा-Champions Trophy Final: भारत की न्यूझीलंड ? २५ वर्षांनंतर ‘त्या’ पराभवाचा वचपा काढण्याची वेळ आली …
खरं तर, दुबई स्टेडियमची (Dubai Stadium) खेळपट्टी खूपच संथ आहे. पण या खेळपट्टीवर संध्याकाळी फ्लडलाइट्सखाली थोडीशी फलंदाजी करणे सोपे मानले जाते. तर दुपारी फलंदाजी करणारा संघ मोठा धावा काढण्यात अपयशी ठरतो. गेल्या 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये, या मैदानावर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला पाच वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यापैकी टीम इंडियाने 4 जिंकले आहेत,ज्यामध्ये रोहितने गेल्या चारही सामन्यांमध्ये टॉस गमावला होता. (Champions Trophy Final 2025)
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या 11 सामन्यांमध्ये नाणेफेक गमावला आहे. गेल्या 14 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाने नाणेफेक गमावली आहे. टीम इंडियाने नाणेफेक हारुनही विजय मिळवले असले तरी अंतिम सामन्यात टॉस महत्त्वाचा आहे. (Champions Trophy Final 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community