-
ऋजुता लुकतुके
रंगतदार झालेल्या चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा ५ गडी राखून पराभव करत चॅम्पियन्स करंडकावर अखेर नाव कोरलं. धावफलकावर भारताने ४ गडी आणि – चेंडू असं दिसत असल्यामुळे सामना अटीतटीचा झाला असा वाचणाऱ्यांचा समज होईल. पण, प्रत्यक्षात भारतीय संघ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नियंत्रणात होता. नाणेफेकीचा कौल मात्र इथंही रोहीत शर्माच्या विरोधात गेला आणि न्यूझीलंडने पहिली फलंदाजी घेतली. त्यामुळे स्वच्छ सूर्यप्रकाशात फलंदाजीची संधी त्यांना मिळाली. पण, भारताच्या चारही फिरकीपटूंनी सामन्यात वेळोवेळी किवी फलंदाजांना खिळ घातली. (Champions Trophy Final)
रचिन रवींद्र (३७) आणि विल यंग (१५) यांनी अर्धशतकी सलामी किवी संघाला करून दिली. पण, धोका ओळखून रोहीतने चौथ्याच षटकांत वरुण चक्रवर्तीकडे चेंडू सोपवला आणि त्यानेही आठव्या षटकांत ही जोडी फोडली. रोहितने मग पुढची ३५ षटकं चारही फिरकीपटूंमध्येच काढली आणि फलंदाजांवर कायम दडपण ठेवलं. वरुणने ४८ धावांत २ तर कुलदीपने ४० धावांत २ बळी मिळवले. जडेजानेही १० षटकांत ३० धावा देत एक बळी घेतला. न्यूझीलंडकडून डेरिल मिचेल (६३) आणि ग्लेन फिलीप्स (३४) यांनी न्यूझीलंडचा डाव सावरला. तर ब्रेसवेलने ४० चेंडूंत ५३ धावा करत न्यूझीलंडचा २५० च्या पार नेलं. (Champions Trophy Final)
(हेही वाचा – २०३० पर्यंत राज्यात ५२ टक्के अपारंपरिक स्त्रोतांपासून ऊर्जा निर्मिती करणार; CM Devendra Fadnavis यांचे विधान)
𝗖. 𝗛. 𝗔. 𝗠. 𝗣. 𝗜. 𝗢. 𝗡. 𝗦! 🇮🇳🏆 🏆 🏆
The Rohit Sharma-led #TeamIndia are ICC #ChampionsTrophy 2025 𝙒𝙄𝙉𝙉𝙀𝙍𝙎 👏 👏
Take A Bow! 🙌 🙌#INDvNZ | #Final | @ImRo45 pic.twitter.com/ey2llSOYdG
— BCCI (@BCCI) March 9, 2025
दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर दुसरी फलंदाजी करताना चेंडू जास्त धिमा बॅटवर येतो आणि चेंडू चांगला वळतोही. त्यामुळे हे आव्हान तितकं सोपं नव्हतं. पण, रोहित शर्मा (७६) आणि शुभमन (३१) यांनी या स्पर्धेतली पहिली शतकी सलामी संघाला करून दिली. त्यानंतर मात्र विराट एका धावेवर बाद झाला आणि छोट्या छोट्या भागिदारींनंतर श्रेयस अय्यर ४८ आणि अक्षर पटेल (२८) आणि के. एल. राहुल (नाबाद ३४) यांनी मधल्या फळीत भक्कम खेळ करत भारताला शेवटच्या षटकांत विजय मिळवून दिला. (Champions Trophy Final)
श्रेयस अय्यरच्या बळीनंतरचा प्रत्येक बळी उर्वरित फलंदाजांवर दडपण वाढवणारा होता. पण, नवीन आलेल्या सगळ्यांनी आपापली जबाबदारी ओळखून धावा वाढवल्या. न्यूझीलंडकडे सँटनर, ब्रेसवेल आणि रचिल रवींद्र या गोलंदाजांची ३० षटकं संपल्यानंतर त्यांना तेज गोलंदाजांकडे वळण्यावाचून गत्यंतर नव्हतं आणि त्याचा फायदा के. एल. राहुल आणि हार्दिक पांड्यानेही उचलला. भारतीय डावांत सगळे मिळून एकूण ९ षटकार होते आणि प्रत्येक षटकाराने भारतीय संघावरील दडपण कमी होत होतं. अंतिम सामन्यांत संघाला जोरदार सुरुवात करून देणारा रोहित शर्मा सामनावीर ठरला. तर १ शतक आणि १ अर्धशतक ठोकणार विराट मालिकावीर ठरला. भारतीय संघाने २०१३ नंतर दुसऱ्यांदा चॅम्पियन्स करंडक जिंकला आहे. तर गेल्यावर्षी टी-२० विश्वचषकानंतर पटकावलेला हा सलग दुसरा आयसीसी करंडक आहे. (Champions Trophy Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community