Champions Trophy Final : भारतीय संघाचा दुबईत जोरदार सराव, दुबईची खेळपट्टी कशी असेल?

रविवारी भारत आणि न्यूझीलंड दरम्यान अंतिम सामना होणार आहे.

68
Champions Trophy Final : भारतीय संघाचा दुबईत जोरदार सराव, दुबईची खेळपट्टी कशी असेल?
Champions Trophy Final : भारतीय संघाचा दुबईत जोरदार सराव, दुबईची खेळपट्टी कशी असेल?
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि न्यूझीलंड संधांदरम्यान रविवारी चॅम्पियन्स करंडकाचा अंतिम सामना रंगणार आहे. त्यासाठी दुबई इंटरनॅशनल मैदानावर (Dubai International Stadium) भारतीय संघाचा जोरदार सराव सुरू आहे. फलंदाज तसंच गोलंदाजांनीही दोन सत्रांमध्ये शनिवारी जोरदार सराव केला आहे. भारतीय संघाचा आतापर्यंतचा फॉर्म बघता त्यांनाच अंतिम फेरीपूर्वी संभाव्य विजेते म्हणून पाहिलं जात आहे. पण, त्याचवेळी न्यूझीलंड संघाला कमी लेखण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. (Champions Trophy Final)

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर (Dubai International Stadium) पाच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळपट्ट्या तयार आहेत. यातील एक सरावासाठी वापरली जात असल्यामुळे इतर ४ खेळपट्टयांवर आलटून पालटून सामने होतात. या स्पर्धेत आतापर्यंत चारही खेळपट्ट्या वापरून झाल्या आहेत. आता अंतिम सामन्यासाठी भारत – पाक (India – Pakistan) सामन्यातील खेळपट्टी पुन्हा वापरण्याचा निर्णय तिथल्या स्थानिक आयोजकांनी घेतला आहे. २३ फेब्रुवारीला भारत – पाक सामना इथं पार पडला होता. त्यानंतर ही खेळपट्टी पुन्हा वापरली जाणार आहे.

(हेही वाचा – China : दुय्यम लेखण्यापेक्षा सहकार्य करणे हे दोन्ही देशांसाठी आवश्यक ! चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे विधान)

‘आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतील तर आम्ही १५ दिवसांच्या ब्रेकचं धोरण अवलंबतो. म्हणजेच, ज्या खेळपट्टीवर सामना होणार ती खेळपट्टी निदान १५ दिवस आधीपर्यंत वापरलेली नसावी, असं आमचं धोरण आहे. दुबईत चॅम्पियन्स करंडकाचं (Champions Trophy Final) आयोजन होणार हे समजल्या समजल्या इथं टी-२० लीग सुरू असतानाही आम्ही स्पर्धेच्या तयारीवर लक्ष केंद्रीत केलं होतं. प्रत्येक सामन्यातील खेळपट्टी १५ दिवसांनंतरच वापरलेली होती. त्यानुसार आता अंतिम सामन्यासाठीची खेळपट्टी निवडली आहे. आणि ती सामन्यासाठी तयार असेल असं आम्ही पाहत आहोत,’ असं एमिरेट्स क्रिकेट मंडळातील सूत्रांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.

चॅम्पियन्स करंडकाचा (Champions Trophy Final) कार्यक्रम जाहीर झाला तेव्हा युएईमध्ये आयएलटी-२० लीग स्पर्धा सुरू होती. त्यामुळे इथली कुटलीही खेळपट्टी नवीन नाही. त्यावर भरपूर क्रिकेट खेळून झालं आहे. पण, तरीही खेळपट्टीला विश्रांती देण्याचं धोऱण ठेवत अंतिम सामन्यासाठीची खेळपट्टी निवडण्यात आली आहे. भारत – पाक (India – Pakistan) सामन्यादरम्यान या खेळपट्टीवर पाकिस्तानने पहिली फलंदाजी करताना २४१ धावा केल्या होत्या. आणि भारताने ४ गडी गमावत हे आव्हान ४३ व्या षटकांतच पार केलं होतं. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद १०० धावा हे सामन्याचं वैशिष्ट्य ठरलं होतं. आताही खेळपट्टी धिमी असल्यामुळे फिरकीपटूंना साथ देईल असा अंदाज आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.