
-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतर दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर विजयाचा एकच जल्लोष सुरू झाला. मैदानावर भारतातून आलेले हजारो पाठीराखे होते. त्यांच्या आनंदालाही पारावार उरला नाही. तर भारतीय खेळाडूंचं सेलिब्रेशन मैदानातच सुरू होतं. बॉलिवूड गाण्यांवर सगळ्यांनी ठेका धरला होता. अशावेळी समालोचन कक्षात असलेल्या माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनाही सेलिब्रेशनमध्ये सहभागी होण्याचा मोह आवरला नाही. ७५ वर्षीय गावस्कर यांनी नृत्य करत आपल्या आनंदाला मोकळी वाट करून दिली आणि त्यांच्या नृत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Champions Trophy Final)
एकीकडे भारतीय संघातील खेळाडूंना सफेद जॅकेट प्रदान केली जात होती आणि स्टार स्पोर्टची निवेदक मयंती लँगरबरोबर गावस्कर यांनी फेर धरला. त्यांच्याबरोबर असलेले रॉबिन उथप्पा आणि इतर खेळाडूंनी गावसकरांसाठी व्यासपीठ मोकळं केलं. ‘सुनील गावस्कर यांना आज कोण थांबवेल? त्यांना कुणीच आज थांबवू नये. त्यांच्यामुळे आम्ही क्रिकेट खेळायला लागलो. त्यांनी भारताकडून पहिल्यांदा करंडक उंचावले आणि आता आम्हीही त्यांच्यासारखेच करंडक उचलण्याचं स्वप्न पाहू शकलो. आज गावस्करांना कुणी थांबवू नये,’ असं स्टुडिओत असलेला हरभजन सिंग म्हणाला. (Champions Trophy Final)
(हेही वाचा – Champions Trophy Final : भारतीय संघाला विजेतेपदानंतर पांढरे कोट का प्रदान करण्यात आले? विजेत्या पांढऱ्या कोटाचं महत्त्व काय?)
𝘿𝙞𝙡 𝙩𝙤𝙝 𝙗𝙖𝙘𝙝𝙘𝙝𝙖 𝙝𝙖𝙞 𝙟𝙞 😍
Just a glimpse of Sunil Gavaskar’s passion and love for Indian cricket! ❤#ChampionsTrophyOnJioStar #INDvNZ #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/0ZJMHjVTIZ
— Star Sports (@StarSportsIndia) March 9, 2025
भारतीय संघाने स्पर्धेत सलग पाच सामने जिंकत चॅम्पियन्स करंडकावर नाव कोरलं आहे. टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघाने सलग दुसरी आयसीसी स्पर्धा जिंकली आहे. आयसीसी आयोजित स्पर्धांमध्ये वर्चस्व राखताना भारतीय संघाने मागच्या २३ पैकी २१ सामने जिंकले आहेत. एकदिवसीय आणि टी-२० प्रकारातही भारतीय संघ सध्या क्रमवारीत अव्वल आहे. (Champions Trophy Final)
(हेही वाचा – Mark Carney कॅनडाचे नवे पंतप्रधान ; भारत-कॅनडा संबंधावर केलं मोठ वक्तव्य !)
Sunil Gavaskar for the win. pic.twitter.com/mePYsGfZC6
— Arnab Ray (@greatbong) March 9, 2025
सुनील गावस्कर यांनी अलीकडेच रोहित शर्माने २५-३० षटकांपर्यंत फलंदाजी करावी असा सल्ला दिला होता. भारतीय संघाला त्याचा फायदाच होईल असं त्यांचं म्हणणं होतं आणि योगायोग असा की, रोहितनेच सलामीला येऊन ७६ धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने ४८ तर के. एल. राहुलने नाबाद ३४ धावा करत महत्त्वाचं योगदान दिलं. (Champions Trophy Final)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community