Champions Trophy Final : चॅम्पियन्स करंडक विजेत्या भारतीय संघाचं हॉटेलमध्ये असं झालं स्वागत

Champions Trophy Final : भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध ४ गडी राखून विजय मिळवत स्पर्धा जिंकली.

73
Champions Trophy Final : चॅम्पियन्स करंडक विजेत्या भारतीय संघाचं हॉटेलमध्ये असं झालं स्वागत
  • ऋजुता लुकतुके

अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ४ गडी आणि ५ चेंडू राखून पराभव करत भारतीय संघाने पुन्हा एकदा चॅम्पियन्स करंडक आपल्या नावावर केला. रोहित शर्माच्या ७६ धावा आणि के. एल. राहुलने नाबाद ३४ धावा करत शेवटपर्यंत लढवलेला किल्ला यांच्या जोरावर भारतीय संघाने ही मजल मारली. तर श्रेयस अय्यरनेही मधल्या फळीत ४८ धावा करत भारताचाच विजय होईल हे सुनिश्चित केलं. अंतिम सामना पाहण्यासाठी दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडिअमवर लोकांनी गर्दी केली होती. तर रविवार असल्यामुळे भारतातूनही अनेक चाहते दुबईला पोहोचले होते. भारतीय संघाचा विजय झाल्यावर चाहत्यांच्या उत्साहाला तर उधाण आलंच. शिवाय भारतीय संघाचं दुबईत ते राहत असलेल्या हॉटेलमध्येही जोरदार स्वागत झालं.

संघाची बस हॉटेलमध्ये दाखल झाली तेव्हापासूनच हॉटेल कर्मचाऱ्यांनी दुतर्फा उभं राहून संघाचं स्वागत केलं. तर चाहतेही हॉटेलबाहेर जमले होते. भारतीय खेळाडूंवर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. तर दोन्ही बाजूला कर्मचारी हातात पेटत्या फुलबाज्या घेऊन उभे होते. (Champions Trophy Final)

(हेही वाचा – visapur fort : विसापूर किल्ल्यामध्ये असेल तर जवळचं रेल्वे स्थानक कोणतं आहे?)

भारतीय संघाने आता सर्वाधिक तीनदा चॅम्पियन्स करंडक स्पर्धा जिंकली आहे. यापूर्वी २००२ आणि २०१३ साली भारताने ही स्पर्धा जिंकली होती. एकदिवसीय विश्वचषकातील पहिल्या आठ संघांमध्ये दर चार वर्षांनी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा होते. भारतीय संघाने यंदा अपराजित राहत ही स्पर्धा जिंकली आहे. साखळीतही भारताने बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला होता. तर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियन संघाचा त्यांनी पराभव केला. (Champions Trophy Final)

(हेही वाचा – Tree : झाडांची वेदनांतून मुक्ती; महिलांनी पुढाकार घेत काढले सुमारे २०० खिळे)

भारतीय संघ एकदिवसीय आणि टी-२० प्रकारात सध्या आयसीसी क्रमवारीत अव्वल आहे. आयसीसीच्या शेवटच्या ३ स्पर्धांमध्ये भारतीय संघाने तब्बल २३ सामने जिंकले आहेत आणि फक्त एक गमावला आहे. हा गमावलेला सामना आहे २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम सामना. या पराभवाची सलही चॅम्पियन्स करंडकातील विजेतेपदामुळे थोडी कमी झाली आहे. (Champions Trophy Final)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.