-
ऋजुता लुकतुके
रविवारी चॅम्पियन्स करंडकाचा (Champions Trophy Final) अंतिम सामना सुरू होईल तेव्हा भारतीय संघच विजेतेपदाचा प्रमुख दावेदार असेल. ज्या थाटात त्यांनी आपली चॅम्पियन्स करंडक मोहीम आतापर्यंत पार पाडली आहे, त्याला तोड नाही. रोहित आणि शुभमन संघाला चांगली सुरूवात करून देत आहेत. तर मधल्या फळीत विराट, अक्षर आणि श्रेयस भक्कम फॉर्मात आहेत. त्यानंतरही हार्दिक, राहुल गरज पडेल तशी आपली बॅट चालवत आहेत. गोलंदाजीचं म्हणाल तर संघात चार फिरकी गोलंदाज खेळवण्याची संघाची रणनीतीही यशस्वी ठरली आहे. त्यामुळे सध्या तरी भारतीय संघ हा जमलेली भट्टी आहे.
आणि २०२३ च्या एकदिवसीय अंतिम फेरीचा अनुभव पाहता कडव्या प्रतिकारासाठी हा संघ नक्कीच तयार असेल. भारतीय संघाला अंतिम फेरीत नेमक्या कुठल्या आव्हानाला सामोरं जायचं आहे हे याचे काही मुद्दे माजी कसोटीपटू दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) संघासमोर ठेवले आहेत. क्रिकबझशी बोलताना कार्तिकने दोन खेळाडूंचा विशेष उल्लेख केला. (Champions Trophy Final)
(हेही वाचा – Champions Trophy Final : सुनील गावसकरांना चिंता रोहितच्या २५-३५ धावांमध्ये बाद होण्याची)
त्याच्यामते, भारतीय संघाने केन विल्यमसन (Kane Williamson) आणि मिचेल सँटनर (Mitchell Santner) या दोन खेळाडूंना सांभाळून खेळलं पाहिजे. ‘केन विल्यमसनचा एकदा जम बसला तर तो मधली अख्खी षटकं खेळून काढू शकतो. साखळी सामन्यातही तो बाद झाल्यावर भारतीय संघासाठी विजय आटोक्यात आला. वरुणने त्याला बाद करेपर्यंत भारतीयांच्या जीवात जीव नव्हता. दुसरीकडे, सँटनर हा शेवटपर्यंत प्रयत्न करणारा खेळाडू आहे. आणि तो फलंदाजांना चांगलाच चकवतो. त्याच्या पोतडीतून काय बाहेर येईल हे सांगता येत नाही,’ या दोघांविरुद्ध भारतीय संघाची रणनीती तयार हवी. (Champions Trophy Final)
आणखी दोन गोष्टींची कार्तिकला काळजी वाटते. त्या गोष्टी म्हणजे न्यूझीलंडचा कडवा प्रतिकार आणि खेळाचं तंत्र. ‘किवी संघ झटपट हार मानत नाही. त्यांचं मैदानावरील क्षेत्ररक्षण, अचूक रणनीती यामुळे ते कायम तुमच्यासमोर पेच निर्माण करत असतात. आणि उपजत प्रतिकारामुळे कुठल्याही क्षणी सामना फिरवू शकतात. त्यासाठी लागणारी सखोल फलंदाजी आणि गोलंदाजीतील विविधता त्यांच्याकडे आहे,’ असं दिनेश कार्तिकला वाटतं. (Champions Trophy Final)
त्याचबरोबर भारताला विजय मिळवून देण्यात वरुण चक्रवर्ती (Varun Chakaravarthy) आणि विराट कोहली (Virat Kohli) मोठी भूमिका बजावू शकतील, असं मतही दिनेश कार्तिकने व्यक्त केलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community