-
ऋजुता लुकतुके
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा ४ गडी राखून पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला असला, तरी सामन्यात एक क्षण असा आला होता जेव्हा कर्णधार रोहित आणि विराट दोघंही कुलदीप यादववर (Kuldeep Yadav) चिडले. विराटने तर कुलदीपला खडे बोल सुनावले. रोहितही त्याच्यावर चिडलेला दिसला. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला आहे. कुलदीप गोलंदाजी करत होता. आणि ऑस्ट्रेलियाकडून स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) तेव्हा जम बसवून खेळत होता. तो ६४ धावांवर असताना त्याने मिडविकेटला चेंडू टोलवून एक धाव घेतली. विराटने (Virat Kohli) चेंडू अडवला आणि गोलंदाज कुलदीपकडे फेकला. कुलदीपने (Kuldeep Yadav) चक्क तो चेंडू पकडण्याऐवजी जाऊ दिला. मागे रोहित शर्माने (Rohit Sharma) अखेर तो अडवला. स्मिथला धावचित करण्याची संधी नव्हती. तरी खेळात हलगर्जीपणा केल्यामुळे विराट आणि रोहित दोघंही त्याच्यावर चिडले. रोहितने लगेचच कुलदीपला (Kuldeep Yadav) सुनावलं. तर विराटही (Virat Kohli) चिडलेला दिसला. सोशल मीडियावर याचा प्रतिक्रिया उमटल्या आहेत. (Champions Trophy, Ind vs Aus)
(हेही वाचा – Maharashtra Politics : गेल्या १० वर्षांत ‘या’ नेत्यांनाही सोडावे लागले होते मंत्रिपद !)
Chuldeep😭😭 https://t.co/KNa6yFug5e pic.twitter.com/fHfGsRl8iD
— S A K T H I ! (@Classic82atMCG_) March 4, 2025
ऑस्ट्रेलियन संघाने त्यानंतर एकूण २६४ धावा जमवल्या. आणि अखेर विराट कोहलीच्या (Virat Kohli) ८४ धावांच्या जोरावर भारताने हा सामना ४ गडी राखून जिंकला. विराटला श्रेयस (४५), राहुल (नाबाद ४२), अक्षर पटेल (२७) आणि हार्दिक (२८) यांनी मजबूत साथ दिली. तर गोलंदाजांमध्ये मोहम्मद शमीने ४८ धावांत ३ गडी बाद केले. वरुण आणि जाडेजाने प्रत्येकी दोन बळी मिळवले. कुलदीप यादव (Kuldeep Yadav) गोलंदाजीत अपयशी ठरला आणि त्याने ८ षटकांत ४४ धावा दिल्या. पण, त्याला बळी मिळाला नाही. (Champions Trophy, Ind vs Aus)
भारतीय संघाने या सामन्यातही कुलदीप, जाडेजा, वरुण आणि अक्षर असे चार फिरकीपटू खेळवले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community