-
ऋजुता लुकतुके
मंगळवारी भारत आणि ऑस्ट्रेलियाचे (Ind vs Aus) संघ चॅम्पियन्स करंडकातील (Champions Trophy) उपान्त्य सामन्यासाठी आमने सामने येतील, तेव्हा भारतीय संघाला जुन्या भळभळत्या जखमेवर मलम लावण्याची संधी आहे. आणि जुन्या कटू आठवणी विसरून चांगल्या आठवणी तयार करण्याचीच संघाची मनिषा असेल. २०१५ त्या एकदिवसीय विश्वचषकात उपान्त्य फेरीत झालेला पराभव आणि २०२३ च्या अंतिम फेरीतील पराभव भारतीय संघ विसरलेला नाही. आणि महत्त्वाच्या आयसीसी (ICC) स्पर्धांमध्ये नेहमीच ऑस्ट्रेलियाच्या विजिगिषू वृत्तीचा विजय झाला आहे. (Champions Trophy, Ind vs Aus)
यावेळी मात्र कागदावर भारतीय संघ काहीसा उजवा आहे. पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) गैरहजेरीत स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) संघाचं नेतृत्व करतोय. पण, संघाला पाकिस्तानमध्ये पुरेसा सामन्याचा सराव मिळू शकलेला नाही. त्यांचे दोन सामने पावसात वाहून गेले. तर तिसरा सामना संपता संपता त्यांना या सामन्यासाठी दुबईला यावं लागलं. त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेण्याचा वेळ देखील संघाला मिळालेला नाही. याउलट भारतीय संघ १५ फेब्रुवारीपासून दुबईत आहे. आणि आपले तीनही सामने इथेच खेळला आहे. (Champions Trophy, Ind vs Aus)
(हेही वाचा – परराष्ट्र मंत्री S. Jaishankar ६ दिवसीय ब्रिटन आणि आयर्लंडच्या दौऱ्यावर)
याचा फायदा भारताला मिळू शकतो. पण, भारतीय संघाला त्यासाठी बाद फेरीतील आधीच्या अपयशाचं भूत मानगुटीवरून काढून टाकावं लागेल. कारण, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये बाद फेरीत शेवटचे सलग तीन सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. बाद फेरीत झालेल्या एकूण ७ सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने ४ तर भारताने ३ सामने जिंकले आहेत. पण, २०१५ पासून ऑस्ट्रेलियाने मिळवलेले विजय मोठे आहेत. (Champions Trophy, Ind vs Aus)
आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीतील भारत – ऑस्ट्रेलिया मुकाबले,
एकूण सामने – ७
ऑस्ट्रेलिया – ४
भारत – ३
या ७ सामन्यांचे निकाल पाहूया,
१९९८ चॅम्पियन्स करंडक – भारताचा ४४ धावांनी विजय
२००३ एकदिवसीय विश्वचषक – ऑस्ट्रेलियाचा १२५ धावांनी विजय
२००७ चा टी-२० विश्वचषक – भारतीय संघाचा ७ धावांनी विजय
२०११ एकदिवसीय विश्वचषक – भारताचा ५ गडी राखून विजय
२०१५ एकदिवसीय विश्वचषक – ऑस्ट्रेलियाचा ९५ धावांनी विजय
२०२३ आयसीसी कसोटी अजिंक्यपद – ऑस्ट्रेलियाचा २०९ धावांनी विजय
२०२३ एकदिवसीय विश्वचषक – ऑस्ट्रेलियाचा ६ गडी राखून विजय
हेही पहा –
Join Our WhatsApp Community