Champions Trophy, Ind vs Ban : बांगलादेशविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवतानाच भारताने मोडले इतके सारे विक्रम

Champions Trophy, Ind vs Ban : भारतीय संघ आता रविवारी पाकिस्तानशी भिडणार आहे.

59
Champions Trophy, Ind vs Ban : बांगलादेशविरुद्ध ६ गडी राखून विजय मिळवतानाच भारताने मोडले इतके सारे विक्रम
  • ऋजुता लुकतुके

आपल्या चॅम्पियन्स करंडक मोहिमेची सुरुवात विजयाने करताना भारताने बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला. शुभमन गिलने आपलं ७ वं शतक झळकावलं तर मोहम्मद शमीने ५३ धावांत ५ बळी मिळवले. शिवाय या सामन्यांत एकदिवसीय क्रिकेटमधील अनेक विक्रमही मोडीत निघाले. त्यांचा आढावा घेऊया, (Champions Trophy, Ind vs Ban)

बांगलादेशने प्रथम फलंदाजी निर्णय घेतल्यावर त्यांची अवस्था ५ बाद ३५ झाली होती. पण, तौफिक आणि झकर यांनी डाव सावरला आणि बांगलादेशला निदान २२८ धावांचा टप्पा गाठून दिला. भारताकडून यावेळी अनेक विक्रम पाहायला मिळाले. (Champions Trophy, Ind vs Ban)

(हेही वाचा – Sindhudurg Tarkarli Beach : पुण्यातील पर्यटक तारकर्ली समुद्रात गेले आणि … दोघांचा दुर्दैवी अंत)

शमीने ५३ धावांत ५ बळी घेतले आणि आयसीसी स्पर्धांमधील तो भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला. त्याने या बाबतीत झहीर खानला मागे टाकलं. शमीच्या नावावर आयसीसी स्पर्धांमध्ये आता ६० बळी जमा झाले आहेत. तर कसोटी अजिंक्यपद स्पर्धा धरून त्याच्या नावावर ७२ बळी आहेत. तर चेंडूच्या निकषावर सगळ्यात जलद २०० एकदिवसीय बळी पूर्ण करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर लागला आहे. शमीने डावांत ५ बळी टिपण्याची कामगिरी सहाव्यांदा केली. भारतासाठी हा ही एक उच्चांक आहे. विशेष म्हणजे यातील ५ वेळा ही कामगिरी त्याने आयसीसी स्पर्धेत केली आहे. हा एक उच्चांकच आहे. (Champions Trophy, Ind vs Ban)

विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५६ झेल पूर्ण केले. भारतासाठी या प्रकारात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम त्याने साध्य केला आहे. तर रोहित शर्माच्या ४१ धावांमुळे त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११,००० धावा पूर्ण केल्या आणि हा मापदंड सर्वात वेगाने ओलांडणारा तो दुसरा आंतरराष्ट्रीय फलंदाज ठरला आहे. कोहलीने २२२ डावांमध्ये हा मापदंड सर केला होता. रोहितने त्यासाठी ३५६ डाव घेतले. (Champions Trophy, Ind vs Ban)

(हेही वाचा – SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिला म्हणून विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या)

शुभमन गिलचं हे आठवं एकदिवसीय शतक होतं आणि त्याचबरोबर सर्वात जलद ८ शतकं करणारा फलंदाज तो बनला आहे. यापूर्वी शिखर धवनने ६० डावांमध्ये ८ शतकं ठोकली होती. तो विक्रम शुभमनने मोडला. तर सचिन तेंडुलकरने १११ डावांमध्ये आपली ८ शतकं पूर्ण केली होती. शुभमनने त्यासाठी ५१ डाव घेतले. (Champions Trophy, Ind vs Ban)

शिवाय २०२२ नंतरचं शुभमनचं हे १४ वं आंतरराष्ट्रीय शतक होतं आणि हा ही एक विक्रमच आहे. मागच्या ३ वर्षांत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं शुभमनच्या नावावर लागली आहेत. भारतीय संघ आता रविवारी २३ तारखेला पाकिस्तानशी दोन हात करणार आहे. (Champions Trophy, Ind vs Ban)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.