-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) बांगलादेशविरुद्ध अक्षर पटेल (Akshar Patel) हॅट-ट्रीकच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण, त्याची ही दुर्मिळ संधी हुकली ती पहिल्या स्लिपमध्ये कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) सोडलेल्या सोप्या झेलामुळे. शिवाय बांगलादेशचा संघ त्यानंतर २२८ धावांपर्यंत पोहोचला ती गोष्ट वेगळीच. बांगलादेशी डावाच्या नवव्या षटकांत रोहितने अक्षरच्या हातात चेंडू ठेवला. बांगलादेशची अवस्था तेव्हा ३ बाद ३५ अशी होती. अक्षरने षटकातील दुसऱ्याच चेंडूवर २५ चेंडूत २५ धावा केलेल्या तनझिद हसनला चकवलं. यष्टीरक्षक राहुलने हा झेल पकडला. त्या पुढच्या चेंडूवर धोकादायक मुशफिकुर रहिमलाही त्याने त्याच पद्धतीने बाद केलं. बांगलादेशची अवस्था ५ बाद ३५ झाली. तर अक्षर हॅट-ट्रीकच्या जवळ पोहोचला. (Champions Trophy, Ind vs Ban)
नवीन फलंदाज झकरसाठी कर्णधार रोहितने (Rohit Sharma) दोन स्लिप आणि एक लेग स्लिपही लावली. अक्षरचा (Akshar Patel) हा हॅटट्रीक चेंडू होता. त्याचा हा चेंडू बरोबर पडला. आणि उजव्या यष्टीवर पडून ते थोडासाच वळला. झकर त्यावर बेमालून चकला. आणि त्याने बॅट मध्ये घातली. चेंडू पहिल्या स्लिपमध्ये रोहितकडे गेला. पण, रोहितने (Rohit Sharma) घाई करत हा मोलाचा झेल सोडला. आणि अक्षरची हॅट-ट्रीक हुकली. झेल सुटल्यानंतर रोहितलाच स्वत:चा राग आला होता. त्याने दोनदा मैदानावर हात आपटले. हा व्हिडिओ पाहूया,
(हेही वाचा – शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरणात Arun Gawli चा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला)
Tanzid ☝️
Mushfiqur☝️
Hattrick… Well, almost! 😮📺📱 Start watching FREE on JioHotstar: https://t.co/dWSIZFgk0E#ChampionsTrophyOnJioStar 👉 #INDvBAN, LIVE NOW on Star Sports 1 & Star Sports 1 Hindi! pic.twitter.com/5mn6Eqivci
— Star Sports (@StarSportsIndia) February 20, 2025
(हेही वाचा – राज्याचे DCM Eknath Shinde यांची गाडी बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा बुलढाण्यातून ताब्यात)
फक्त झेल सुटला इतकंच नाही तर पुढे जाऊन झकरने ६८ धावा केल्या. आणि शतकवीर तौहीद ह्रिदोयसह (Towhid Hridoy) १५४ धावांची भागिदारी केली. आणि बांगलादेशला २०० धावांच्या पलीकडे पोहोचवलं. ‘त्या षटकांत खूप सारी ॲक्शन घडली. तिसरा चेंडू बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला, तेव्हाच मी आनंद साजरा करायला सुरुवात केली होती. आणि इतक्यात मला दिसलं की, झेल सुटला आहे. मला वाईट नक्कीच वाटलं. पण, या गोष्टी क्रिकेटमध्ये घडत असतात. पहिल्या १५ षटकांनंतर खेळपट्टी फलंदाजीसाठी थोडी जास्त सोपी झाली. आणि भारताने विजय मिळवला तर सुटलेल्या झेलाचं फारसं दु:ख राहणार नाही,’ असं अक्षर दोन डावांमधील सुटीत स्टार स्पोर्टवर बोलताना म्हणाला.
अखेर भारतीय संघाने विजय मिळवलाच. शुभमन गिल (Shubman Gill) १०१ आणि राहुल ४१ यांनी नाबाद ८७ धावांची भागिदारी करत विजय साध्य केला. भारताची सुरुवात चॅम्पियन्स करंडकात (Champions Trophy) विजयाने झाली आहे. आता २३ तारखेला भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये मुकाबला होईल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community