Champions Trophy, Ind vs NZ Final : चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीसाठी दुबईत १ लाख लोकांची तिकिटासाठी झुंबड

अंतिम सामना ९ मार्चला भारत वि न्यूझीलंड दरम्यान होणार आहे.

52
Champions Trophy, Ind vs NZ Final : चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीसाठी दुबईत १ लाख लोकांची तिकिटासाठी झुंबड
Champions Trophy, Ind vs NZ Final : चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीसाठी दुबईत १ लाख लोकांची तिकिटासाठी झुंबड
  • ऋजुता लुकतुके

चॅम्पियन्स करंडकाच्या (Champions Trophy) अंतिम सामन्यात भारतीय संघाने प्रवेश केल्या केल्या तिकीट विक्रीवर त्याचा परिणाम दिसून आला. तिकिटं विक्रीसाठी खुली झाल्या झाल्या दोन तासांतच १ लाखांच्यावर लोकांनी त्यासाठी ऑनलाईन वेबसाईटवर गर्दी केली. अखेर २ तासांत तिकिटं संपलीही आहेत. उपान्त्य सामन्यांत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्या केल्या तिकिटांसाठी गर्दी वाढल्याचं दिसून आलं. एका क्षणी एक लाख लोकांपेक्षा जास्त लोक ऑनलाईन रांगेत उभे होते.

सध्या अंतिम सामन्यासाठी ऑनलाईन तिकीट विक्री पार पडली आहे. अजून प्रत्यक्ष स्टेडिअमवरील विक्री सुरू झालेली नाही. त्यामुळे चाहत्यांना अजूनही तिकीट खरेदीची आशा बाळगता येईल. पण, ऑनलाईन विक्रीत लोकांचा जोश पाहायला मिळाला. कारण, एकूण १२ प्रकारची तिकिटं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यात सगळ्यात महाग तिकिटं १२,००० दरहॅम मूल्याची होती. भारतीय रुपयांत ही किंमत सुमारे ३ लाख रुपये इतकी भरते. ही तिकिटंही हातोहात खपली.

(हेही वाचा – परराष्ट्र मंत्री S. Jaishankar यांच्यावर खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी केला हल्ल्याचा प्रयत्न; समाजमाध्यमांवर व्हिडिओ व्हायरल)

दुबईतही भारताच्या सामन्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पवित्र रमादान महिना सुरू असूनही तिकिटांना हा प्रतिसाद मिळाला आहे. पहिल्या भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यांत ६० टक्के प्रेक्षकांनीच सामन्याला हजेरी लावली. हा एक अपवाद वगळता दुबईत प्रेक्षकांनी सामन्यांना चढता प्रतिसाद दिला आहे. भारत वि पाकिस्तान (India vs Pakistan) आणि भारत वि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) सामन्यांसाठी तर ९० टक्के स्टेडिअम भरलेलं होतं. आता अंतिम सामन्यासाठीही ते हाऊसफुल्ल असेल अशी शक्यता आहे.

एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे सीओओ शदीन अहमद यांनी मीडियाशी बोलताना तिकीट विक्रीवर आपली प्रतिक्रिया दिली. ‘रमादानच्या महिन्यात रोजा सुटल्यानंतर खरंतर लोक आपापल्या घरीच वेळ घालवणं पसंत करतात. पण, यावेळी रमादानच्या दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्घचा सामना झाला. आणि तरीही सामन्यासाठी गर्दी होती. त्यामुळे चॅम्पियन्स करंडकाला (Champions Trophy) चांगलाच प्रतिसाद मिळालाय असं म्हटलं पाहिजे. काही लोकांनी तिकिटं खरेदी केली. पण, ते आले नाहीत, असंही उपस्थितीवरून दिसून आलं,’ असं अहमद म्हणाले.

भारतीय संघ अंतिम फेरीत असल्यामुळे चॅम्पियन्स करंडकाचा अंतिम सामनाही पाकिस्तानमधून दुबईत हलवण्यात आला आहे. आता येत्या ९ तारखेला भारत आणि न्यूझीलंडचे (Ind vs NZ Final) संघ अंतिम सामन्यांत एकमेकांना भिडतील.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.