Champions Trophy, Ind vs Pak : आखातात रंगलेल्या ५ भारत-पाक रंगतदार लढती

Champions Trophy, Ind vs Pak : जावेद मियांदादचा शेवटच्या चेंडूवरील षटकार हा शारजातीलच.

49
Champions Trophy, Ind vs Pak : आखातात रंगलेल्या ५ भारत-पाक रंगतदार लढती
Champions Trophy, Ind vs Pak : आखातात रंगलेल्या ५ भारत-पाक रंगतदार लढती
  • ऋजुता लुकतुके

भारत, पाकिस्तानमधील (Ind vs Pak) क्रिकेट द्वंद्व हे आखाती देशांतील दोन संघादरम्यानच्या लढतींशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. जावेद मियांदादने (Javed Miandad) चेतन शर्माला (Chetan Sharma) शेवटच्या चेंडूवर लगावलेला षटकार, सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) शारजातील वाळूच्या वादळादरम्यान गोलंदाजांची केलेली धुलाई असे अनेक प्रसंग या द्वंद्वाचे भाग आहेत. खासकरून १९८० आणि १९९० च्या दशकात अनेक भारत-पाक (Ind vs Pak) लढती इथे गाजल्या आहेत. अशाच पाच रंगतदार लढतींचा आढावा इथे घेऊया,

२२ मार्च १९८५ (रोथमॅन्स चषक) – भारताचा ३८ धावांनी विजय

भारतीय संघाने पहिली फलंदाजी करताना फक्त १२५ धावा केल्या होत्या. मोहम्मद अझहरुद्दीनचा तो उदयाचा सामना. आणि त्याने कपिल देवच्या (Kapil Dev) साथीने संघाला निदान सव्वाशेची मजल मारून दिली. तर इम्रान खानने १४ धावांत ६ बळी घेऊन रोखलं होतं. पहिला डाव झाल्यावर वाटलं सामना इथेच संपला आहे. पण, त्यानंतर जे घडलं ते अद्भूत होतं. पाकिस्तानचा अख्खा संघ ८७ धावांतच बाद झाला. कपिल देवने (Kapil Dev) १७ धावांत ३ बळी मिळवले. तर रवी शास्त्रीने मोक्याच्या जागी २ बळी घेत आपला जलवा दाखवून दिला.

(हेही वाचा – SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिला म्हणून विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या)

१८ एप्रिल १९८६ (ऑस्ट्रेलेशिया चषक) – पाकिस्तानचा १ गडी राखून विजय

भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) दरम्यानच्या लढती खास का आहेत, हे या सामन्याकडे बघून कळेल. भारतीय संघाने पहिली फलंदाजी करत २४५ धावा केल्या. सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) ९२ आणि श्रीकांतच्या ७९ धावा यांचं योगदान यात होतं. शारजाची खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक होती. त्यामुळे सामना भारताला सोपा जाणार असं वाटत असतानाच, ३ बाद ६१ धावसंख्येवर जावेद मियांदाद (Javed Miandad) नावाचं वादळ मैदानावर उतरलं. त्याच्या ११६ धावांनी सामन्याचा नूरच पालटून गेला. शेवटच्या चेंडूवर पाकला जिंकण्यासाठी ४ धावा हव्या होत्या. चेतन शर्मा (Chetan Sharma) यॉर्कर टाकणार होता. पण, तो फुलटॉस पडला आणि मियांदादने तो चेंडू थेट मिडविकेटला सीमापार भिरकावून दिला. या षटकारासह पाकिस्तानने हा सामना जिंकला आणि इथून पुढे कित्येक वर्ष या षटकाराची जखम भारतीय क्रिकेटवर राहिली. (Champions Trophy)

२३ ऑक्टोबर १९९१ (विल्स करंडक) – पाकिस्तानचा ४ गडी राखून विजय

पाकिस्तानने पहिली फलंदाजी करताना २५७ धावा केल्या होत्या. आमीर सोहेलने तडाखेबाज ९१ धावा करत पाक डावाला आकार दिला होता. त्या काळात ही धावसंख्या मोठी होती. शिवाय पाककडे वकार, वसिम आणि इम्रान असा तोफखाना होता. पण, भारताने चांगली सुरुवात केली. रवी शास्त्रीने ७७ धावा करत मजबूत सुरुवात केली. तर विनोद आणि सचिनने ४० – ४० धावांचं योगदान देत धावा वाढवल्या. सचिनने ३८ चेंडूंत ४९ धावा करत भारताला विजयाच्या अगदी जवळ आणलं होतं. पण, तो बाद झाल्यावर धावगती राखणं भारताला जमलं नाही आणि भारताला विजयासाठी ४ धावा कमी पडल्या. (Champions Trophy)

(हेही वाचा – तिन्ही रेल्वेमार्गांवर रविवारी Megablock ; कोणत्या लोकल रद्द? वाचा …)

१५ एप्रिल १९९६ (पेप्सी शारजा चषक) – भारताचा २८ धावांनी विजय

या सामन्यातून पाकिस्तानचं शारजातील वर्चस्व संपुष्टात आलं. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि नवज्योत सिद्धू (Navjot Sidhu) यांनी दुसऱ्या गड्यासाठी तब्बल २३१ धावांची भागिदारी रचली. सचिनने ११८ तर सिद्धूने १०१ धावा केल्या. अकिब जावेद, वकार युनूस आणि सकलेन मुश्ताक यांच्या माऱ्यामोर दोघं हिमतीने उभे राहिले. म्हणून या कामगिरीला महत्त्व आहे. भारताने ५ बाद ३०५ धावा केल्या. याला उत्तर देताना पाकिस्ताननेही चांगली सुरुवात केली होती. आमीर सोहेलने ७८ तर रशिद लतिफने ५० धावा केल्या. पण, अखेर त्यांना २८ धावा कमी पडल्या. त्यांचा अख्खा संघ २७७ धावांत बाद झाला. (Champions Trophy)

१९ एप्रिल २००६ (डीएलएफ चषक) – भारताचा ५१ धावांनी विजय

तोपर्यंत सट्टेबाजीच्या आरोपांमुळे भारताने आखाती देशांत खेळणं सोडलं होतं. पण, डीएलएफ चषकामुळे एक संधी चालून आली. राहुल द्रविड (Rahul Dravid) या सामन्यात भारताचा कर्णधार होता आणि त्याने ९२ धावा केल्या. तर वीरेंद्र सेहवागनेही ७३ धावांचं योगदान दिलं. धोनी आणि युवराजने शेवटी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २६९ धावा जमवल्या. याला उत्तर देताना पाकिस्तानकडूनही चांगली फलंदाजी झाली. इंझमाम उल हकने ७९ धावा केल्या. तर शोएब मलिकने ४६ धावा केल्या. पण, त्यांचे गडी ठरावीक अंतराने बाद होत गेले आणि तिथेच भारताचा विजय नक्की झाला. २१८ धावांत पाकिस्तानचा संघ सर्वबाद झाला. रमेश पोवार आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवले. (Champions Trophy)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.