Champions Trophy, Ind vs Pak : भारत-पाकचा सार्वकालीन सर्वोत्तम ११ जणांचा संघ

Champions Trophy, Ind vs Pak : चॅम्पियन्स करंडकात भारत-पाक संघ रविवारी आमने-सामने येणार आहेत.

61
Champions Trophy, Ind vs Pak : भारत-पाकचा सार्वकालीन सर्वोत्तम ११ जणांचा संघ
  • ऋजुता लुकतुके

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघातील वैर हा जितका लोकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे तितकाच वेळ दोन्ही देशांतील क्रिकेट रसिक दोघांचा एकत्र संघ बनवताना घालवतात. त्यातही एकमेकांचे वाद झडतात ती गोष्ट वेगळी. अगदी भल्या भल्या क्रिकेटपटूंनाही हा प्रश्न चुकलेला नाही. चॅम्पियन्स करंडकाच्या निमित्ताने दोन्ही संघ पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत आणि त्या निमित्ताने पाहूया, भारत आणि पाकिस्तानचा हिंदुस्थान पोस्टने बनवलेला सार्वकालीन सर्वोत्तम संघ,

सचिन तेंडुलकर – सचिन तेंडुलकरच्या अनेक अविस्मरणीय एकदिवसीय खेळी या पाकिस्तानविरुद्ध साकार झालेल्या आहेत. २००३ च्या विश्वचषकात सेंच्युरियनमध्ये केलेल्या ९३ धावा कोण विसरेल? उभय देशांमध्ये झालेल्या ६९ सामन्यांत त्याने ४० च्या सरासरीने धावा करताना सचिनने ५ शतकं झळकावली आहेत. (Champions Trophy, Ind vs Pak)

(हेही वाचा – SSC Exam : बोर्डाच्या परीक्षेत उत्तरपत्रिका दाखवण्यास नकार दिला म्हणून विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या)

सईद अन्वर – सईद अन्वरचा जन्म भारताविरुद्ध पाकिस्तानला जिंकून देण्यासाठीच झाला होता असं म्हणावं लागेल. इतक्या सातत्याने त्याने भारताविरुद्ध धावा केल्या आहेत. १९९७ मध्ये त्याच्या १९४ धावा हा अजूनही एक विक्रमच आहे. त्याची भारताविरुद्धची सरासरी ४३ धावांची आहे. पण, त्याचा भारताविरुद्धचा पगडा विसरता येण्यासारखा नाही. त्यामुळेच रोहीत शर्माला मागे टाकून तो दुसरा सलामीवीर बनला आहे.

विराट कोहली – विराट कोहली पाकिस्तानविरुद्ध फक्त १६ सामने खेळला आहे. पण, त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या १८३ पाकिस्तानविरुद्धच आहे. त्याने पाक विरुद्ध ३ शतकं झळकावली आहेत आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटने निर्माण केलेला दबदबा विसरता येण्यासारखा नाही. (Champions Trophy, Ind vs Pak)

(हेही वाचा – आता Government Medical College मध्ये ॲप्रनसक्ती लागू; राज्य सरकारचा आदेश)

इन्झमाम उल हक – भारत आणि पाकिस्तानमधील वैर हा पठ्ठ्या खऱ्या अर्थाने जगला आहे. मैदानावर ४३ च्या सरासरीने धावा करणं असो किंवा टोरँटोत भारतीय प्रेक्षकांनी आलू, आलू असं चिडवल्यावर त्याचा झालेला संताप असो, भारत-पाक सामने जर सगळ्यात गांभीर्याने कुणी घेत असेल तर तो इंझमाम.

जावेद मियांदाद – जावेद मियांदादने चेतन शर्माला शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार कुणीही विसरणार नाही. भारताविरुद्धच्या ३५ सामन्यात त्याची सरासरी तब्बल ५१ धावांची आहे. शारजातील ११८ धावांच्या त्याच्या खेळीची जखम भारतीय क्रिकेटवर पुढील एक दशक कायम राहिली. (Champions Trophy, Ind vs Pak)

(हेही वाचा – Shri Krishna Janmabhoomi साठी आता ऑस्ट्रेलियातून राबवणार चळवळ; भव्य परिसंवादातून सुरु होणार मोहीम)

इम्रान खान (कर्णधार) – इम्रान खानला मागच्या ५० वर्षांतील सर्वोत्तम कर्णधार मानण्यात येतं, निदान आशियात तरी. पाकिस्तानातील कुशल खेळाडू ओळखून त्यांना पैलू पाडण्याचं काम इम्रानने केलं. भारताविरुद्ध १४ धावांत ६ बळी टिपण्याची त्याची कामगिरी ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम मानण्यात येते.

महेंद्रसिंग धोनी (उपकर्णधार) – पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी धोनीला भर मैदानात आपल्या भाषणात मोठे केस कापून लहान करू नको असा प्रेमळ सल्ला दिला होता. कारण, धोनीची पाकिस्तानमधील लोकप्रियताच तशी होती आणि याला कारण होतं त्याची कामगिरी. विशाखापट्टणम इथं १२३ चेंडूंत १४३ धावा करून त्याने पाकच्या तेज गोलंदाजांच्या तोंडात फेस आणला होता. (Champions Trophy, Ind vs Pak)

(हेही वाचा – BBC वर मोठी कारवाई: एफडीआय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ठोठावला ३.४४ कोटींचा दंड)

कपिल देव – १९८० च्या दशकात भारतीय तेज गोलंदाजीचा भार कपिलने एकट्याने वाहिला आहे आणि त्या काळात भारतीय संघ पाकिस्तानवरही वर्चस्व राखून होता तो कपिलमुळेच. १९८५ साली बेन्सन हेजेस चषकात पाकिस्तानविरुद्ध बॅट आणि चेंडूनेही त्याने मोलाची कामगिरी केली आणि भारताला सामन्यासह चषक जिंकून दिला. तर शारजात त्याच्यामुळे भारताने पाकविरुद्ध १२५ धावांचाही यशस्वीपणे बचाव केला.

अनिल कुंबळे – भारत आणि पाकिस्तान आशियातील खेळपट्टयांवर जास्त खेळले असले तरी फिरकीपटू फारसे चमक दाखवू शकलेले नाहीत. अपवाद फक्त अनिल कुंबळेचा. कोटला मैदानावर कुंबळेनं डावांत १० च्या १० बळी मिळवले ते पाकिस्तान विरुद्धच. तर एकदिवसीय सामन्यांमध्येही कुंबळेनं ३४ सामन्यांत ५४ बळी मिळवले आहेत. (Champions Trophy, Ind vs Pak)

(हेही वाचा – Manipur मध्ये 17 दहशतवाद्यांना अटक)

वसिम अक्रम – भारत-पाक सामन्यांमध्ये ४८ डावांत ६० बळी वसिम अक्रमने मिळवले आहेत. क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक तो मानला जातो आणि १९८०, ९० च्या दशकात भारत, पाक सामनेही त्याने गाजवले.

सकलेन मुश्ताक – सकलेन मुश्ताकनेही भारताविरुद्ध ३७ सामन्यांमध्ये ५७ बळी मिळवले आहेत. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुली हे भारतीय फलंदाजीचे आधारस्तंभरही सकलेनसमोर बावचळायचे, असा त्याचा करिश्मा होता. त्याचा दुसरा भल्या भल्यांना गोंधळून टाकायचा. (Champions Trophy, Ind vs Pak)

(हेही वाचा – Safari Bags : आणि सफारी बॅग्जनी ३ वर्षांत मागे टाकलं…)

या अकरा जणांमध्ये सलीम मलिक, अकीब जावेद, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह  आणि अजय जाडेजा यांची नावं नाहीएत. पैकी बुमराह पाकिस्तान विरुद्ध फारसे सामने खेळला नाहीए. तर इतरांची कामगिरी पुरेशी सातत्यपूर्ण नाहीए. कारण, खेळाडूंची सरासरीही गृहित धरण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.