चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy) भारताची अपराजित मोहीम सुरूच आहे. रविवारी संघाने न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला. रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर २५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ ४५.३ षटकांत २०५ धावांवरच आटोपला. स्पिनर वरुण चक्रवर्तीने Varun Chakravarthy ५ बळी घेतल्याने भारताला हा सामना जिंकणे शक्य झाले. या विजयासह, भारताने ग्रुप ए मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे, म्हणजेच भारताचा उपांत्य सामना ४ मार्च रोजी त्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होईल. दरम्यान, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघ आणखी एका उपांत्य फेरीत खेळतील.
मॅट हेन्री २, मिचेल सँटनर २८, केन विल्यमसन ८१ धावा, मायकेल ब्रेसवेल २, ग्लेन फिलिप्स १२, टॉम लॅथम १४, डॅरिल मिचेल १७, विल यंग २२ आणि रचिन रवींद्र ६ धावा करून बाद झाले. वरुण चक्रवर्तीने Varun Chakravarthy ५ विकेट्स घेतल्या. अक्षर रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ ५० षटकांत ८ गडी गमावून केवळ २४९ धावा करू शकला. श्रेयस अय्यरने ७९ धावा केल्या. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ५ विकेट्स घेतल्या. (Champions Trophy)
Join Our WhatsApp Community