- ऋजुता लुकतुके
कुठल्याही आयसीसी (ICC) स्पर्धेत होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) सामना हा ब्लॉकबस्टर समजला जातो. आताही चॅम्पियन्स करंडकातील (Champions Trophy 2025) भारत – पाक (Ind vs Pak) सामन्याची तिकिटं विक्री सुरू झाल्यापासून अर्ध्या तासांत हातोहात खपली आहेत. अजूनही काही लोकांनी आपली मागणी नोंदवून ते ताटकळत उभे आहेत. दुबई तसंच जगभरातून या सामन्यासाठीच्या तिकिटांना मागणी होती असं दिसतंय. येत्या २३ फेब्रुवारीला दुबई इंटरनॅशनल स्टेडिअमवर (Dubai International Stadium) हा सामना होणार आहे. भारतीय संघ स्पर्धेतील आपले सर्व सामने याच मैदानावर खेळेल. भारत उपान्त्य फेरी तसंच अंतिम फेरीत पोहोचल्यास, ते सामनेही दुबईतच होणार आहेत.
(हेही वाचा – Weather Update: राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता; पारा 35 अंशांच्या पुढे; हवामानाचा अंदाज काय सांगतो ?)
भारत – पाक (Ind vs Pak) सामन्याची तिकिटं ऑनलाईन तसंच ऑफलाईनही उपलब्ध होती. खरेदीसाठी स्टेडिअमवर आलेल्या अनेकांची निराशा झाली. लांब रांग असेल अशा तयारीत आलेल्या लोकांना रांग पाहायला मिळाली नाही. उलट तिकिटं संपल्याची पाटी त्यांचं स्वागत करत होती.
1,20,000 people in queue at the very second tickets have gone live for India Pakistan, champions trophy match. This for just 6000 tickets going on sale. Hands down the biggest sporting rivalry pic.twitter.com/hiSDa9Ot2N
— Amit Lodha (@CantCancelMeNow) February 3, 2025
(हेही वाचा – Sonia Gandhi अडचणीत; संसदेत विशेषाधिकार भंगाची नोटीस)
‘तिकिटाला मोठी रांग असेल. त्यामुळे स्टेडिअमवर थोडं जास्त थांबावं लागेल असं वाटलं होतं. पण, इथं आलो तर तिकीटं संपलेली होती. आणि ज्या दोन श्रेणींची तिकीटं उपलब्ध आहेत ती आम्हाला परवडणारी नाहीत,’ असं दुबईमध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिक सुधाश्री यांनी आयएनएएस या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. २००० दिरहॅम किमतीची प्लॅटिनम श्रेणीतील तिकिटं तसंच ५००० दिरहॅम किमतीची लाऊंजमधील तिकिटंही जवळ जवळ संपली आहेत.
१९ फेब्रुवारी ते ९ मार्च दरम्यान होणारी ही स्पर्धा पाकिस्तान आणि दुबईत संयुक्तपणे होणार आहे. भारताचे सामने दुबईत तर इतर सर्व सामने पाकिस्तानच्या कराची, लाहोर व इस्लामाबाद इथं होणार आहेत. भारत व पाकिस्तानच्या (Ind vs Pak) संघांचा समावेश ए गटात असून त्यांच्याबरोबर बांगलादेश आणि न्यूझीलंड हे इतर दोन संघ असतील. यापूर्वी २०१७ मध्ये शेवटची चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy 2025) स्पर्धा झाली होती. आणि त्यात पाकिस्तानने भारताला हरवूनच विजेतेपद पटकावलं होतं.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community