- ऋजुता लुकतुके
जुलै १९ ते २२ दरम्यान श्रीलंकेत कोलंबो इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेतील एक महत्त्वाचा विषय चॅम्पियन्स करंडकातील (Champions Trophy) भारताचा सहभाग हा असेल हे नक्की. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये अपेक्षित आहे. पाकिस्तानमध्ये भारतीय संघ पाठवायला बीसीसीआय उत्सुक नाही. केंद्रसरकारने यासाठी परवानगी नाकारल्याचं बीसीसीआयचं (BCCI) म्हणणं आहे. तर पाकिस्तानचा प्रयत्न असेल तो भारतावर दबाव आणण्याचा.
(हेही वाचा- भर पावसाळ्यातही Melghat च्या ९ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा)
बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jai Shah) या बैठकीसाठी कोलंबोला जाणार आहेत. तर पाकिस्तानकडून मोहसीन नकवी स्वत: बैठकीसाठी जातील. तीन दिवसीय बैठकीच्या अजेंडात चॅम्पियन्स करंडकाचा मुद्दा नाही. पण, क्रिकेटविषयक इतर गोष्टी या सदरात पाकिस्तान मंडळ चॅम्पियन्स करंडकाचा मुद्दा उपस्थित करू शकतं. (Champions Trophy)
पाकिस्तानने यापूर्वी आयसीसीला सादर केलेल्या वेळापत्रकानुसार, चॅम्पियन्स करंडक (Champions Trophy) स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ८ मार्च दरम्यान पाकिस्तानमध्ये प्रस्तावित आहे. भारतीय संघ आपले तीनगी साखळी सामने लाहोरला खेळणार आहे. तर उपान्त्य फेरीचे दोन सामने कराची आणि रावळपिंडीला होँणार आहेत. अंतिम फेरी पुन्हा लाहोरमध्येच होणार आहे. बांगलादेश (Bangladesh), न्यूझीलंड (New Zealand) आणि पाकिस्तान (Pakistan) हे संघ भारतीय गटात असतील.
(हेही वाचा- Death of a Cricketer : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशनाची पत्नी, मुलांसमोर हत्या)
पण, भारताने संघ पाठवायला नकारच दिला तर आयसीसीला हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यावाचून पर्याय राहणार नाही. यामध्ये भारताचे सामने पाकिस्तानबाहेर श्रीलंका किंवा युएईला घेतले जाऊ शकतात. पण, या गोष्टीला सध्या पाकिस्तान तयार नाही. त्यामुळे पाकिस्तानचं आर्थिक नुकसान होतं, असा त्यांचा दावा आहे. म्हणूनच त्यांनी भारताने पाकिस्तानमध्ये खेळावं नाहीतर नुकसान भरपाई द्यावी अशी भूमिका घेतली आहे. (Champions Trophy)
भारतीय संघ चॅम्पियन्स करंडक न खेळल्यास भारताऐवजी श्रीलंकेला स्पर्धेत स्थान मिळेल. (Champions Trophy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community