
पाकिस्तानच्या (Pakistan) यजमानपदाखाली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy PAK vs NZ) सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा पहिला सामना यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे खेळला गेला. यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आलेला एअर शो (Air show) पाहून स्टेडियमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. (Champions Trophy PAK vs NZ)
Pakistan isn’t for the faint-hearted, especially those who tread with fear of an air show being incoming fire! Watching the NZ batters duck for cover was the best unplanned drill today 😂 #ChampionsTrophy2025 pic.twitter.com/mLWbJwOM4H
— Adit (@IndicSocietee) February 19, 2025
पाकिस्तानी हवाई दलाच्या या प्रदर्शनामुळे न्यूझीलंडच्या (New Zealand) खेळाडूंच्या मनात भीती निर्माण झाली. खरंतर, कराची स्टेडियमवरून पाकिस्तानी विमान उडताच, त्याच्या मोठ्या आवाजाने खेळाडू घाबरले. त्यांना क्षणभर वाटले की काहीतरी अनुचित घडले आहे, पण जेव्हा समजले की, हा फक्त एक हवाई कार्यक्रम आहे, तेव्हा सर्व हसू लागले. (Champions Trophy PAK vs NZ)
View this post on Instagram
हा सामना पाकिस्तानात होत असल्याने भीती वाटणे स्वाभाविक आहे. कारण, 2007 चे ते भयानक दृश्य कोण विसरेल ? जेव्हा पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या खेळाडूंवर दहशतवादी हल्ले झाले होते. श्रीलंकेच्या एका खेळाडूला गोळी लागली. या अपघातानंतर पाकिस्तानमध्ये अनेक वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर बंदी घालण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आता पाकिस्तानात पुन्हा खेळवले जात असले तरी सुरक्षेबाबत अनेक प्रश्न आहेत. (Champions Trophy PAK vs NZ)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community