-
ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकापूर्वी पाकिस्तानमधील स्टेडिअम वेळेत पूर्ण नसल्याची तक्रार सगळीकडून होत होती. आणि त्यामुळे ऐनवेळी संपूर्ण स्पर्धाच पाकिस्तान बाहेर हलवावी लागणार की काय, अशी शंकाही व्यक्त होत होती. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ॲलरडाईस यांना या मुद्यावरून अलीकडेच राजीनामाही द्यावा लागला. अशी सगळीकडून कोंडी झालेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शुक्रवारी लाहोरमधील गद्दाफी स्टेडिअमचा एक व्हीडिओ जारी केला आहे. ‘रात्रीच्या दिव्यांमध्ये स्टेडिअमचा नजारा आपल्या नजरा खिळवून ठेवतो,’ असं या व्हीडिओत लिहिलं आहे. तिरंगी मालिका आणि चॅम्पियन्स करंडकासाठी येणाऱ्या प्रेक्षकांचं स्वागत करायला आम्ही सज्ज आहोत, असंही या संदेशात लिहिलं आहे. (Champions Trophy)
Unveiling the stunning new-look Gaddafi Stadium! Under the lights, it’s a sight to behold! 🏟️✨
ONE WORD to describe your excitement after seeing this breathtaking view? 👇
We can’t wait to welcome fans, officials and teams for the tri-nation series & #ChampionsTrophy 🏆@ICC… pic.twitter.com/fsr3WoYI03
— Pakistan Cricket (@TheRealPCB) January 30, 2025
१९ फेब्रुवारीला कराचीतील नॅशनल स्टेडिअमवर स्पर्धेचा पहिला सामना रंगणार आहे. ते स्टेडिअमही वेळेत पूर्ण होईल असा पाक बोर्डाचा दावा आहे. देशातील महत्त्वाचं वृत्तपत्र असलेल्या डॉनने अलीकडेच चॅम्पियन्स करंडकाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उभं करणारी लेखमाला वृत्तपत्रात छापली होती. तेव्हाच्या स्टेडिअमची चित्र दाखवून त्यांनी लिहिलं होतं की, ‘स्टेडिअम स्पर्धेपूर्वी पूर्ण झाली तर ते राक्षसी आव्हान यशस्वीपणे पेलण्यासारखं असेल, नाहीतर पाकिस्तानची नाचक्की अटळ आहे.’ त्याचबरोबर बांधकामाची जबाबदारी असलेले अधिकारी आत्मविश्वासाने, काम वेळेत पूर्ण करणार असल्याचं म्हणतायत, असंही त्यांनी म्हटलं होतं. (Champions Trophy)
(हेही वाचा- Mumbai-Pune Expressway वरील अपघात किती टक्क्यांनी वाढले ? पोलिसांनी सांगितली आकडेवारी)
पाकिस्तानने हा व्हीडिओ जारी केला असला तरी नुतनीकरणानंतर स्टेडिअमचा ताबा पाक बोर्डाला नेमका कधी मिळणार हे अजून स्पष्ट नाही. तिकीट विक्री मात्र सुरू झाली आहे. कराची आणि रावळपिंडीमधील स्टेडिअम फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण होणार आहेत. चॅम्पियन्स करंडकाचं यजमानपद मिळाल्यावर पाक क्रिकेट बोर्डाने १२ अब्ज अमेरिकन डॉलर खर्चून या तीनही स्टेडिअमच्या नुतनीकरणाचं काम हाती घेतलं होतं. आयसीसीकडूनही पाकिस्तानच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे. (Champions Trophy)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community