- ऋजुता लुकतुके
बोर्डर-गावस्कर चषकातील पराभवानंतर आता भारतीय संघाचं पुढील लक्ष असेल ते चॅम्पियन्स करंडकावर. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत पराभव झाला असला तरी आता सफेद चेंडूचं आव्हान भारतीय संघासमोर उभं आहे. आधी इंग्लंड विरुद्धची टी-२० आणि एकदिवसीय मालिका आणि त्यानंतर चॅम्पियन्स करंडक असा संघाचा पुढील प्रवास असणार आहे. चॅम्पियन्स करंडकासाठी संघाची निवड १२ जानेवारीपूर्वी करायची आहे आणि त्याला अवकाश असला तरी संघाची सध्याची स्थित्यंतराची स्थिती पाहता काही चर्चा अपेक्षितच आहेत. (Champions Trophy Squad)
कर्णधारपदी रोहित शर्मा कायम राहील हे निश्चित आहे. पण, उपकर्णधारपदावर नवीन खेळाडूचा विचार होऊ शकतो. कारण, रोहित भारतीय संघात फार काळ राहणार नाही. अशावेळी भावी कर्णधार निवडण्याच्या दृष्टीने ही स्पर्धाही महत्त्वाची असणार आहे आणि ते पाहता निवड समितीचा ओढा हार्दिक पांड्या किंवा शुभमन गिल यांच्याकडे नाही तर जसप्रीत बुमराहकडे आहे. यापूर्वी हार्दिक आणि गिल भारताचे एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमधील उपकर्णधार होते. (Champions Trophy Squad)
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांनी अधिकाऱ्यांना दिला ७ कलमी कार्यक्रम)
पण, सध्या दोघांचंही संघातील स्थान डळमळीत आहे आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जसप्रीत बुमराहने बोर्डर-गावस्कर मालिकेत कर्णधार म्हणूनही आपली कामगिरी सिद्ध केली आहे. सध्या पाठीच्या दुखापतीमुळे बुमराचं चॅम्पियन्स करंडक खेळणंच अनिश्चित आहे. त्यामुळे या निर्णयात काही बदल होऊ शकतो. पण, बुमराह येत्या दिवसांत भारतीय क्रिकेटमध्ये अधिक जबाबदारीच्या भूमिका निभावणार हे आता नक्की आहे. (Champions Trophy Squad)
राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक असताना हार्दिक पांड्या आणि त्याच्या अनुपस्थितीत के. एल. राहुलने उपकर्णधाराची भूमिका निभावली आहे. तर गंभीर आल्यानंतर त्याने युवा शुभमनवर ही जबाबदारी सोपवली. पण, आता हार्दिकची संघातील जागा हळू हळू नितिश रेड्डी घेऊ शकतो आणि शुभमन गिलच्या कामगिरीतही सातत्य नाही. अशावेळी रोहीतचा कायमस्वरुपी वारसदार म्हणून बुमराहचाच विचार अधिक होऊ शकतो. (Champions Trophy Squad)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community