चेन्नई सुपर किंग्स चौथ्यांदा चॅम्पपियन!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या चेन्नईचे हे चौथे आयपीएल जेतेपद ठरले.

97

ऋतुराज गायकवाड आणि ड्यूप्लेसिस यांनी चेन्नईला चांगली सुरुवात करवून दिली. ड्यूप्लेसिसच्या (८६) उत्कृष्ट फलंदाजीनंतर, शार्दुल ठाकूरने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे (३/३८) चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सवर २७ धावांनी मात करून इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४ हंगामाचे विजेतेपद पटकावले.

चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब

क्वालिफायरच्या सामन्यात धावांचा यशस्वीरित्या पाठलाग करणा-या कोलकाताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने २० षटकांत ३ बाद १९२ अशी धावसंख्या उभारली आणि विजयासाठी कोलकाताला १९३ धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता नाईट रायडर्सला २० षटकांत ९ बाद १६५ धावा करता आल्या. शार्दुल ठाकूरने तीन, जोश हेजलवूड आणि रवींद्र जाडेजाने प्रत्येकी २-२ विकेट घेत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

(हेही वाचा : मलिकांच्या आरोपातील फ्लेचर पटेल, लेडी डॉन कोण? वाचा…)

कॅप्टन कूलच्या नेतृत्वाखाली चौथ्यांदा चॅम्पपियन

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या चेन्नईचे हे चौथे आयपीएल जेतेपद ठरले. याआधी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने २०१०, २०११ व २०१८ मध्ये आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. कर्णधार म्हणून ३०० वा टी-२० सामना खेळणारा धोनी जगातील पहिला कर्णधार बनला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.