- ऋजुता लुकतुके
यंदाचा रॅपिड व ब्लिट्झ बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धा अव्वल खेळाडू मॅग्नस कार्लसनसाठी वादग्रस्त ठरत आहे. आधीच पेहरावाच्या नियमावलीवरून त्याने रॅपिड स्पर्धा अर्धवट सोडली. त्यानंतर जीन्स घालायला परवानगी दिल्यावर तो ब्लिट्झमध्ये खेळायला उतरला. पण, अंतिम फेरीत त्याने आणि इयान नेपोमिनियाची यांनी तीन लढतींनंतरच विजेतेपद विभागून घेण्याचं आपापसात मान्य केलं. या तीन लढतींत निकाल लागला नव्हता. त्यामुळे दोघांना संयुक्त विजेते जाहीर करण्यात आलं. पण, त्यांच्या या कृतीवर जगभरातून टीकाही होतेय. (Chess Blitz World Cup)
तीन लढतींनंतर संयुक्त विजेतेपदाचा प्रस्ताव कार्लसननेच मांडला. त्यावर अशा परिस्थितीत विजेता ठरवण्यासाठी किंवा स्पर्धा पूर्ण करणं बंधनकारक करण्यासाठी फिडेनं कुठेलेली नियम आखलेले नाहीत यावर आता आश्चर्य व्यक्त होत आहे. माजी जगज्जेता खेळाडू व्लादिमीर क्रामनिक याने फिडेवर टीका केली आहे. ‘अशी परिस्थिती उद्भवली तर काय करायंच याचे नियम फिडेनं बनवले नाहीत, याचं मला आश्चर्य वाटतं. पण, फिडेचा सगळा वेळ पेहरावा संबंधीचे नियम बदलण्यात गेल्यामुळे, स्पर्धेपूर्वी त्यांना हे सुचलं नसावं,’ अशी खरमरीत टीका क्रामनिकने केली. (Chess Blitz World Cup)
(हेही वाचा – Ayodhya Ram Mandir: ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘इतक्या’ लाख भाविकांनी घेतले रामललाचे दर्शन)
कार्लसन जीन्स घालून स्पर्धेच्या ठिकाणी आल्यावर निर्माण झालेल्या वादाविषयी क्रामनिक बोलत होता. अखेर कार्लसनला जीन्स घालण्यासाठी परवानगी देण्यात आली. मगच तो ब्लिट्झ प्रकारात खेळला. पहिल्या फेरीत त्याने अमेरिकन हान्स निमनला हरवलं होतं. निमनने झाल्या प्रकारावर ट्विटची एक मालिकाच लिहिली आहे. (Chess Blitz World Cup)
‘फिडे आणि ही स्पर्धा हा एक मोठा विनोद बनली आहे. कुठल्याही स्पर्धेत असं पूर्वी कधी झालेलं नाही. बुद्धिबळात एकच जगज्जेता असू शकतो,’ असं खरमरीत मत निमनने व्यक्त केलं आहे. (Chess Blitz World Cup)
(हेही वाचा – Union Carbide चा विषारी कचरा तब्बल 40 वर्षांनंतर उचलला)
The chess world is officially a joke. THIS HAS NEVER BEEN DONE IN HISTORY. I can’t believe that the official body of chess is being controlled by a singular player FOR THE 2ND TIME THIS WEEK. THERE CAN ONLY BE ONE WORLD CHAMPION!
— Hans Niemann (@HansMokeNiemann) January 1, 2025
फक्त इतकंच नाही तर निमनने झाल्या प्रकाराची चौकशी करावी अशीही मागणी केली आहे. कारण, संयुक्त विजेतेपदानंतर एक क्लिप व्हायरल झाली आहे. यात कार्लसन नेपोमिनियाचीशी बोलत आहे. ‘जर फिडेनं बरोबरी मान्य केली नाही तर झटपट बरोबरीचे सामने खेळत राहू. जोपर्यंत ते ऐकत नाहीत, तोपर्यंत आपण तेच करत राहू,’ असं कार्लसन नेपोमेनियाचीला म्हणताना दिसतो. (Chess Blitz World Cup)
हंगेरियन ग्रँडमास्टर सुझान पोल्गरनेही झाल्या प्रकारावर टीका केली आहे. गेल्यावर्षी दोन खेळाडूंनी लढतीत बरोबरी मान्य केली म्हणून त्यांचे गुण कापण्यात आले होते. मग यावेळी वेगळं का घडलं? असा सवालच पोल्गरने विचारला आहे. (Chess Blitz World Cup)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community