Chess Olympiad 2024 : भारतीय पुरुषांच्या संघाने जिंकलेला बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा चषक गहाळ

170
Chess Olympiad 2024 : भारतीय पुरुषांच्या संघाने जिंकलेला बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा चषक गहाळ
Chess Olympiad 2024 : भारतीय पुरुषांच्या संघाने जिंकलेला बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा चषक गहाळ
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय पुरुषांच्या बुद्धिबळ संघाने गेल्यावर्षी जिंकलेलं ऑलिम्पियाड कांस्य पदक चक्क कार्यालयातून गायब झालं आहे. ते मिळत नसल्याची तक्रार पोलिसांमध्ये करण्याची नामुष्की भारतीय बुद्धिबळ संघटनेवर ओढवली आहे. या चुकीमुळे भारताला आता या पदकाची प्रतिकृती बनवून ती आंतरराष्ट्रीय संघटनेला सादर करावी लागणार आहे. कारण, हा चषक फिरता आहे. ही लाजिरवाणी गोष्ट नेमकी अशावेळी उघड झाली आहे, जेव्हा हंगेरीत बुडापेस्ट इथं यंदाची बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा सुरू आहे. (Chess Olympiad 2024)

(हेही वाचा- Cidco: हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करणं आता शक्य होणार! सिडकोने दिली आनंदाची बातमी)

२०२२ मध्ये भारतीय संघाने हा चषक पटकावला होता. आता तो बुडापेस्टला न्यायचा होता. कारण, नवीन विजेत्याला तो द्यावा लागणार आहे. अशावेळी तो गायब झाल्याचं भारतीय संघटनेच्या लक्षात आलं. ‘गेला महिनाभर हा चषक नेमका कुठे आहे ते कुणाला माहितीच नव्हतं. आता चो आंतरराष्ट्रीय संघटनेला परत देण्याची वेळ आल्यावर नेमका तो मिळेनासा झाला आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे,’ असं भारतीय बुद्धिबळ संघटनेचे उपाध्यक्ष अनिल कुमार रायझादा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. (Chess Olympiad 2024)

अखेर भारतीय संघटनेनं पोलीस तक्रार केली आहे. फिडेला नवीन चषक बनवण्याची विनंतीही केली आहे. ‘ही खूपच लाजिरवाणी गोष्ट आहे. आम्ही महिनाभर सर्व कार्यालयातील जागा नीट तपासल्या. पण, चषक काही मिळाला नाही. शेवटी फिडेला आम्ही अडचण सांगितली. त्यांनीच प्रतिकृती बनवण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं अनिल कुमार म्हणाले. (Chess Olympiad 2024)

(हेही वाचा- Sharad Pawar यांची सुप्रीम कोर्टात धाव! निवडणुकांपूर्वी केली ‘ही’ मोठी विनंती)

सध्या हंगेरीत बुडापेस्ट इथं ही स्पर्धा सुरू आहे. १९५ देशांचे १९७ संघ स्पर्धेत सहभागी झाले आहेत. २३ तारखेला स्पर्धेची अंतिम फेरी पार पडेल. भारतीय पुरुष व महिला संघ सध्या प्रथम क्रमांकावर आहेत. (Chess Olympiad 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.