Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेता विदित पंतप्रधानांच्या भेटीसाठी अझरबैजानहून परतला 

Chess Olympiad : अझरबैजानमधील स्पर्धेत विदित गुजराथी गतविजेता आहे

72
Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेता विदित पंतप्रधानांच्या भेटीसाठी अझरबैजानहून परतला 
Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेता विदित पंतप्रधानांच्या भेटीसाठी अझरबैजानहून परतला 
  • ऋजुता लुकतुके 

भारताच्या पुरुष आणि महिला बुद्धिबळ संघांनी नुकतीच बुद्धिबळ ऑलिम्पियाड ही मानाची सांघिक स्पर्धा जिंकली आहे. स्पर्धेच्या ९७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला सुवर्ण पदक पटकावता आलं. ते ही एकावेळी दोन्ही संघांनी ही किमया केली आहे. त्यामुळे सुवर्ण विजेते खेळाडू सध्या तो आनंद साजरा करण्यात गुंग आहेत. संघातील एक खेळाडू विदित गुजराती हा खरंतर अझरबैजानची राजधानी बाकूमध्ये पुढील स्पर्धा खेळण्यासाठी पोहोचला होता. पण, संघाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते सत्कार होणार असल्यामुळे तो चक्क बाकूहून परत निघाला आहे. (Chess Olympiad)

विदित या स्पर्धेतील गतविजेता आहे. संघ सहकारी अर्जुन एरिगसीचा (Arjun Erigaisi) पराभव करत त्याने ही स्पर्धा जिंकली होती. पण, गुरुवारी ऑलिम्पियाड विजेत्या संघाचं कौतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडूंना नवी दिल्लीत त्यांच्या घरी बोलावलं आहे. त्यासाठी विदित बाकूहून भारतात परतत आहे. (Chess Olympiad)

(हेही वाचा- Rahul Gandhi भारतीय आहेत कि विदेशी? उच्च न्यायालयाची केंद्र सरकारकडे विचारणा)

‘खरंतर मी पुढील स्पर्धेसाठी बाकूला पोहोचलो होतो. पण, इथं आल्यावर मला कळलं की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आमचं स्वागत करणार आहेत. त्यासाठी त्यांनी गुरुवारी आम्हा खेळाडूंना त्यांच्या घरी आमंत्रित केलं आहे. ही संधी मी चुकवू इच्छित नाही. इतक्या व्यस्त कार्यक्रमातून ते आमच्यासाठी वेळ काढत आहेत, ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे मी नवी दिल्लीत परतण्याचा निर्णय घेतला आहे,’ असं विदितने आपल्या ट्विटर खात्यावरील संदेशात लिहिलं आहे. (Chess Olympiad)

२९ वर्षीय विदित गुजरातीच्या ऐवजी आता अरविंदम चिदंबरम बाकू येथील स्पर्धेत खेळणार आहे. ‘स्पर्धेचा आयोजक सारखन गुशिमोव्हसी मी बोललो आहे. त्याने माझ्या भावना समजून घेत मला स्पर्धा चुकवण्यासाठी परवानगी दिली. त्याबद्दल मी त्याचा आभारी आहे,’ असं विदितने संदेशात म्हटलं आहे. (Chess Olympiad)

(हेही वाचा- Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्या खेळाडूंना ३.२ कोटी रुपयांचं बक्षीस)

भारतीय बुद्धिबळात सुवर्ण युग सुरू झाल्याची प्रतिक्रिया विदित गुजराथीने दिली आहे. भारतातील प्रग्यानंदा आणि डी गुकेश हे दोन ग्रँडमास्टर वयाने १८ वर्षांहूनही लहान आहेत. तर डी गुकेश कँडिडेट्स चषक जिंकून इतक्या लहान वयात जगज्जेत्याचा आव्हानवीर ठरला आहे. गेल्या २-३ वर्षांत मिळवलेल्या या यशामुळे बुद्धिबळ क्षेत्रात भारताचं हे यश गौरवलं जात आहे. (Chess Olympiad)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.