Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्या खेळाडूंना ३.२ कोटी रुपयांचं बक्षीस

Chess Olympiad : ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी ऐतिहासिक सुवर्ण जिंकलं आहे 

61
Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्या खेळाडूंना ३.२ कोटी रुपयांचं बक्षीस
Chess Olympiad : बुद्धिबळ ऑलिम्पियाड विजेत्या खेळाडूंना ३.२ कोटी रुपयांचं बक्षीस
  • ऋजुता लुकतुके 

४५ व्या बुद्धिबळ ऑलिंपियाड (Chess Olympiad) स्पर्धेत खुल्या गटात भारतीय पुरुष संघाने आणि महिलांच्या गटात महिला संघाने ऐतिहासिक सुवर्ण पदकांची कमाई केली. त्यानंतर भारतीय बुद्धिबळ संघटनेनं दोन्ही संघांसाठी तब्बल ३.२ कोटी रुपयाचं बक्षीस जाहीर केलं आहे. पदक विजेत्या खेळाडूंचा नवी दिल्ली इथं बुधवारी सत्कार करण्यात आला. त्या कार्यक्रमात भारतीय बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नितीन नारंग (Nitin Narang) यांनी ही घोषणा केली.

(हेही वाचा- PM Narendra Modi : मुसळधार पावसामुळे पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द)

संघातील प्रत्येक खेळाडूला २५ लाख रुपये मिळतील. तर पुरुष संघाचा कर्णधार अभिजीत कुंटे (Abhijeet Kunte) आणि महिला संघाचा कर्णधार श्रीनाथ नारायणन (Srinath Narayanan) यांना प्रत्येकी १५ लाख रुपये दिले जातील. या स्पर्धेसाठीचा भारतीय पथक प्रमुख होता देबेंदू बारुआ. त्याला १० लाख रुपये तर प्रत्येक सहाय्यक प्रशिक्षकाला ७.५ लाख रुपये दिले जाणार आहेत. ‘सुवर्ण पदकासाठीची भारताची भूक हंगेरीत शमली आहे. पण, आता यशासाठी आसुसलेले हात थांबणार नाहीत. विजयाचा सिलसिला सुरूच राहील,’ असं नितीन नारंग सत्कार कार्यक्रमात बोलताना म्हणाले. (Chess Olympiad)

 ‘भारतीय बुद्धिबळपटू हे पटावरील शार्पशूटर आहेत. विश्वनाथन आनंदने काही दशकांपूर्वी रोवलेल्या बियांना आता मधुर फळं आली आहेत. ऑलिम्पियाडमधील यशामुळे देशात नवीन बुद्धिबळ क्रांती घडून येईल,’ असं मत बुद्धिबळ संघटनेचे महासचिव देव पटेल यांनी व्यक्त केलं. बुद्धिबळ ऑलिम्पियाड सुरू होऊन ९७ वर्षं झाली आहेत. आणि इतक्या वर्षांत भारताने मिळवलेलं हे दुसरं पदक आहे. तर पहिल्यांदाच भारतीय चमूने सुवर्ण कामगिरी केली आहे. (Chess Olympiad)

(हेही वाचा- Navi Mumbai च्या 3500 हून अधिक स्वच्छताकर्मींची आरोग्य तपासणी)

पुरुषांच्या संघात डी गुकेश, अर्जुन एरिगसी, प्रग्यानंदा, विदिथ गुजराती आणि हरिकृष्णा हे युवा खेळाडू होते. तर महिला संघात हरिका द्रोणवल्ली, दिव्या देशमुख, तानिया सचदेव व आर वैशाली या प्रमुख खेळाडू होत्या. अर्जुन एरिगसी खुल्या गटात अपराजित राहिला. तर गुकेशनेही ११ पैकी १० सामने जिंकले. पुरुषांच्या संघाने तर स्पर्धेतील संभाव्य २२ गुणांपैकी तब्बल २१ गुण कमावले. म्हणजे ११ सामन्यांत फक्त दोनदा भारतीय संघाने बरोबरी साधली. बाकी १० सामने भारताने जिंकले. (Chess Olympiad)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) बुद्धिबळ चमूला बुधवारी स्वत:हून शुभेच्छा दिल्या. त्यांनी खेळाडूंना आपल्या निवासस्थानी भेटायला बोलावलं आहे.  (Chess Olympiad)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.