- ऋजुता लुकतुके
भारताचा तंत्रशुद्ध कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये २०,००० धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो चौथा भारतीय आहे. रणजी करंडकाच्या विदर्भा विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात ४४ आणि दुसऱ्या डावात त्याने ६६ धावा केल्या. ते करतानाच हा महत्त्वाचा मैलाचा दगड त्याने सर केला आहे. (Cheteshwar Pujara 20,000 Club)
३४ वर्षीय पुजाराच्या (Cheteshwar Pujara) या खेळींमुळेच सौराष्ट्राने हा सामनाही जिंकला. पहिल्या डावात पुजाराने १०७ चेंडूंमध्ये ४४ धावा करताना ४ चौकार आणि १ षटकार ठोकला. तर दुसऱ्या डावात कठीण परिस्थिती खेळताना तो तीन तास खेळपट्टीवर तळ ठोकून राहिला. आणि यात १३७ चेंडूंमध्ये त्याने उपयुक्त ६६ धावा केल्या. यात १० चौकार होते. सौराष्ट्राने हा सामना २३८ धावांनी जिंकला. (Cheteshwar Pujara 20,000 Club)
Milestone Unlocked 🔓
2⃣0⃣,0⃣0⃣0⃣ First-Class runs for Cheteshwar Pujara! 🙌
He becomes the 4th Indian batter to reach this landmark 👏👏#TeamIndia | @cheteshwar1 pic.twitter.com/wnuNWsvCfH
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 21, 2024
(हेही वाचा – Australian Open 2024 : युवा टॉमेक बर्केटाची ताशी २३३ किमी वेगाने सर्व्हिस)
पुजाराच्या (Cheteshwar Pujara) खात्यात आता २६० प्रथमश्रेणी सामन्यांमधून २०,०१३ धावा जमा आहेत. यात त्याची सरासरी आहे ती ५१.९८ धावांची. आणि त्याच्या नावावर ६१ शतकं आणि ७८ अर्धशतकं आहेत. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे ३५३. (Cheteshwar Pujara 20,000 Club)
पुजारा (Cheteshwar Pujara) आता २०,००० प्रथमश्रेणी धावा नावावर असलेल्या ४ दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. आणि ही नावं आहेत सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आणि राहुल द्रविड. पुजाराची (Cheteshwar Pujara) कामगिरी इतकी दमदार असूनही जून २०२३ पासून तो भारतीय कसोटी संघात खेळलेला नाही. २०२३ची आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धा ही त्याची शेवटची कसोटी आहे. १०३ आंतरराष्ट्रीय कसोटींत त्याने ४३ धावांच्या सरासरीने ७,१९५ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर १९ शतकं आणि ३५ अर्धशतकं जमा आहेत. तर त्याची वैयक्तिक सर्वोत्तम धावसंख्या आहे २१६. (Cheteshwar Pujara 20,000 Club)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community