रहाणे आणि पुजारा निवृत्त होणार?

भारत आणि साउथ आफ्रिकेमधील शेवटची टेस्ट केपटाउनमध्ये खेळली जात आहे. या सामन्यात भारताचा डाव गुरुवारी पूर्णपणे ढासळला. या मालिकेत भारताला मिडल ऑर्डरमधील खेळाडूंकडून निराश व्हावे लागले. मिडल ऑर्डरमध्ये असणारे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा या सिनिअर खेळाडूंनी निराश केल्यामुळे चाहत्यांकडून या दोन्ही सिनिअर खेळाडूंवर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. सध्या ट्विटरवर रहाणे ट्रेंड करत आहे. दोघांनाही वारंवार संधी मिळूनही त्यांना खेळता न आल्याने रहाणे आणि पुजारा निवृत्ती घेतील अशी चर्चा सध्या सुरु आहे.

रहाणे आणि पुजाराने केलं निराश

मालिका सुरु होण्याआधीपासूनच रहाणे आणि पुजारा यांना संघात स्थान दिल्याबाबत प्रश्न विचारले जात होते. या दोन्ही खेळाडूंनी शतकी पारी खेळून बराच काळ लोटला आहे. या दोघांनाही मागच्या काही सामन्यांमध्ये आपला दबदबा दाखवता आलेला नाही. चेतेश्वर पुजाराने 3 सामन्यांमध्ये 124 धावा, तर अजिंक्य रहाणेने 3 सामन्यांमध्ये 136 धावा केल्या. दोघांनीही एक -एक अर्धशतक मारलं आहे.

नेटकरी नाराज

दोघांकडूनही सिनिअर म्हणून अपेक्षित असलेला खेळ त्यांना खेळता आलेला नाही. त्यामुळे नेटक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ट्विटरवर सध्या रहाणे आणि पुजारा यांच्या निवृत्तीची मागणी केली जात आहे. तसेच, या सिनिअर खेळाडूंमुळे युवा खेळाडू बसून असल्याचेही अनेक नेटक-यांनी म्हटले आहे.

( हेही वाचा अंत्ययात्रेला २०, लग्नाला १०० जणांची उपस्थिती, ‘निकाह’ मात्र तुडुंब गर्दीत! ठाकरे सरकारचा उफराटा न्याय )

प्रथमेश नावाच्या नेटक-याने एक मॅच तो अच्छा खेलके जाओ असं मिम्स शेअर करत म्हटलं आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here