-
ऋजुता लुकतुके
चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत (China Masters Badminton Tournament) चुरशीच्या लढतीत भारतीय जोडीचा पराभव झाला आहे. त्यामुळे वर्षअखेर होणाऱ्या बॅडमिंटन सुपरसीरिज अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग काहीसा कठीण झाला आहे. (China Masters Badminton)
बॅडमिंटन दुहेरीतील भारताची आघाडीची जोडी सात्त्विकसाईराज रांकीरेड्डी (Satwiksairaj Rankireddy) आणि चिराग शेट्टी (Chirag Shetty) यांचा चायना मास्टर्स स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीत चुरशीच्या लढतीत पराभव झाला आहे. लिअन वाय केंग आणि वाँग चेंग या चायनीज जोडीने त्यांचा २१-१९, १८-२१ आणि २१-१९ असा पराभव केला. पहिले दोन गेम तर चुरशीचे झालेच. शिवाय तिसऱ्या गेममध्ये भारतीय जोडीने एकदा १-८ आणि त्यानंतर १३-१९ अशी पिछाडीवर असताना सलग गुण मिळवत स्पर्धेत कमबॅक करण्याचे खूप प्रयत्न केले. पण, अखेर ते तोकडेच पडले. उलट चिनी जोडीने आशियाई क्रीडास्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला. (China Masters Badminton)
A brilliant campaign for SatChi without dropping a game, until that thrilling final.
Well done boys 👏👏
📸: @badmintonphoto #ChinaMasters2023#IndiaontheRise#Badminton pic.twitter.com/4pr5Dt03qN
— BAI Media (@BAI_Media) November 26, 2023
(हेही वाचा – Textile Museum : मुंबईतील गिरण्यांचा इतिहास लवकरच पाहता येणार जलपटावर)
भारतीय जोडीने या वर्षांत सहाव्यांदा एखाद्या सुपरसीरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत मजल मारली आणि पहिल्यांदाच त्यांचा पराभव झाला. इतर पाच स्पर्धा त्यांनी जिंकल्या आहेत. सातत्यपूर्ण कामगिरीनंतर काही आठवड्यापूर्वी भारतीय जोडीने क्रमवारीत अव्वल स्थानही पटकावलं होतं. पण, सध्या ते जागतिक क्रमवारीत ही जोडी पाचवी आहे. तर चिनी जोडी अव्वल आहे. (China Masters Badminton)
इतर खेळांप्रमाणेच बॅडमिंटनमध्येही वर्षाच्या शेवटी सुपरसीरिज स्पर्धांची एक अंतिम स्पर्धा घेतली जाते. दुहेरीत अव्वल आठ जोड्यांना या स्पर्धेत स्थान मिळतं. भारतीय जोडी या स्पर्धेत मात्र काहीशी मागे आहे. कारण, या स्पर्धेत प्रवेशासाठी भारतीय संघाची क्रमवारी सध्या आहे तेरावी आणि पहिल्या आठ जोडींमध्ये स्थान मिळवण्यासाठी दोघांना काहीसं झगडावं लागेल. (China Masters Badminton)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community