जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये चिराग – सात्विक यांना कांस्यपदक

122

जपानची राजधानी टोकियो येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताची स्टार जोडी चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांनी इतिहास रचला आहे. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरी प्रकारात चिराग-सात्विक यांच्या जोडीने भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे. या स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत कांस्यपदक जिंकणारी सात्विक आणि चिराग ही पहिलीच भारतीय पुरुष जोडी ठरली आहे. मात्र, उपांत्य फेरीत सात्विक-चिराग यांचा मलेशियाच्या जोडीने पराभव केला.

( हेही वाचा : ३० लाख लोक बेघर, ९३७ जणांचा मृत्यू; पाकिस्तानात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर)

जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये चिराग – सात्विक यांना कांस्यपदक

उपांत्य फेरीत मलेशियाच्या अ‍ॅरॉन चिया आणि सोह वुई यिक या जोडीने सात्विक – चिराग यांचा 20-22, 21-18, 21-16 असा पराभव केला. यासह भारताची रौप्य किंवा सुवर्णपदक जिंकण्याची आशा संपुष्टात आली. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारी ही दुसरी भारतीय जोडी आहे. यापूर्वी अश्विनी पोनप्पा आणि ज्वाला गुट्टा यांनी 2011 मध्ये या स्पर्धेत पदक जिंकले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.