सावरकर तायक्वांदो अकॅडमीमध्ये तीन वर्षांपूर्वी दम्यावर उपचार म्हणून तायक्वांदो शिकण्यासाठी आलेली जीयाना शर्मा हिने चक्क राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे. CISCE बोर्डच्या आंतरशालेय तायक्वाँदो राष्ट्रीय स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या ५२ वजनी गटात जीयाना शर्मा हिने हे यश मिळवले.
लढतीच्या वेळी श्वास अडकत होता
११ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत CISCE बोर्डच्या आंतरशालेय तायक्वाँदो राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. अटीतटीच्या लढतीत जीयाना शर्मा हिने सुवर्णपदक पटकावले. याविषयी माहिती देताना सावरकर तायक्वांदो अकॅडमीचे प्रमुख राजेश खिलारी म्हणाले, ३४वी CISCE बोर्डची आंतरशालेय तायक्वाँदो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये जीयाना शर्मा ही दम्याची रुग्ण असून लढतीच्या वेळी गंभीररीत्या श्वास अडकत असतानाही तिने बाजी मारली. अंतिम लढतीच्या वेळी तर तिच्या डोळ्यांवर भुरळ येत होती. तरीही ती हिमतीने खेळली आणि जिंकली. जीयानाला दम्याचा आजार आहे. डॉक्टरांनी तिला उपचार म्हणून तायक्वांदो शिकण्यास सांगितले होते, त्यानुसार ती सावरकर तायक्वांदो अकॅडमीत आली, उपचारासाठी आलेली जीयाना तीन वर्षांत राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेती झाली, असे खिलारी म्हणाले.
(हेही वाचा ज्ञानवापीतील शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली)
Join Our WhatsApp Community