- ऋजुता लुकतुके
बलात्काराच्या आरोपांनंतर हॉकीपटू वरुण कुमारने (Varun Kumar) प्रो लीगमधून माघार घेतली आहे. वरुण कुमार (Varun Kumar) भारतीय बचाव फळीतील महत्त्वाचा खेळाडू मानला जातो. २०२१ मध्ये त्याला अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे. त्याच्यावरील आरोप आणि संघावर होणारा परिणाम यावर भारतीय हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक क्रेग फलटन यांनी पहिल्यांदा भाष्य केलं आहे. वरुणची गैरहजेरी हा संघासमोरचा दुखापतीमुळे निर्माण झालेला प्रश्न असं मानण्यात येईल, असं ते म्हणाले. (Varun Kumar Rape Allegation)
वरुणवर एका महिलेनं बलात्काराचे आरोप केल्यानंतर बंगळुरू पोलिसांनी त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत कारवाई सुरू केली आहे. आणि स्वत: वरुणने प्रो लीगमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. ‘आपल्या विरुद्ध पद्धतशीर खंडणी मागण्याचा हा प्रकार आहे,’ असं त्याचं म्हणणं आहे. आणि प्रो लीगमधून सुटी घेऊन तो त्याच्यासमोरचे कायदेशीर पर्याय तपासणार आहे. भारतीय संघाचा (Indian team) पहिला सामना शनिवारीच स्पेनविरुद्ध होणार आहे. ‘तसं बघितलंत तर संघासाठीही ही आव्हानात्मक परिस्थिती आहे. पण, शेवटी आम्ही व्यावसायिक आहोत. आणि आम्हाला अशा परिस्थितीसाठीही तयार राहिलंच पाहिजे. आणि आम्ही तयार आहोत,’ असं फलटन सामन्या पूर्वीच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. (Varun Kumar Rape Allegation)
(हेही वाचा – Paytm Crisis : पेटीएमच्या युपीआय उद्योगावरही गदा?)
भारतीय संघाने केली पॅरिस ऑलिम्पिकची तयारी
‘असे सनसनाटी प्रसंग संघाचंही मन विचलित करणारे असतात. पण, आम्हाला त्यातून मार्ग काढून पुढे गेलं पाहिजे,’ असंही फलटन म्हणाले. तर भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने वरुणला (Varun Kumar) त्याच्या कायदेशीर लढाईसाठी शुभेच्छा दिल्या. ‘वरुणला पॅरिस ऑलिम्पिक पूर्वी खेळण्याच्या चांगल्या संधी मिळू देत. तो संभाव्य २९ जणांमध्ये आहे. त्यामुळे लागोपाठ दुसरं ऑलिम्पिक खेळण्याची संधी त्याला आहे. ही स्पर्धा गेली तरी पुढील दक्षिण आफ्रिका दौरा आणि आशियाई अजिंक्यपद स्पधेत तो संघात परतू शकतो,’ असं हरमनप्रीत म्हणाला. भारतीय संघाने आता पॅरिस ऑलिम्पिकची तयारी सुरू केली आहे. आणि या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी भारताची मायदेशातील ही शेवटची स्पर्धा आहे. प्रो लीग स्पर्धा शनिवारपासून भुवनेश्वर इथं सुरू होत आहे. (Varun Kumar Rape Allegation)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community