नेदरलँड्स विरुद्ध भारतीय कर्णधार रोहीत शर्माने तब्बल नऊ गोलंदाज वापरले. म्हणजे यष्टीरक्षक के एल राहुल आणि श्रेयस अय्यर सोडले तर इतर प्रत्येकाने किमान एक षटक टाकलं. आणि विशेष म्हणजे स्वत: रोहीत आणि विराटने (Virat Kohli) यात एकेक बळीही मिळवला.
यापैकी विराटने (Virat Kohli) घेतलेल्या बळीमुळे गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे प्रभावित झाले आहेत. यापूर्वी विराटने शेवटचा आंतरराष्ट्रीय बळी मिळवला होता तो २०१६ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध. त्यानंतर आता त्याने डच कर्णधार एडवर्ड्सला चकवलं.
View this post on Instagram
विराटने (Virat Kohli) मिळवलेल्या बळीचं वर्णन पारस यांनी विराट आणि के एल राहुल यांनी खेळपट्टीवर घातलेला धुमाकूळ असं केलं आहे. कारण, विराटच्या चेंडूवर राहुलने एडवर्ड्सला यष्टीचीत केलं. ‘विराटने या बळीसाठी चांगले डावपेच आखले होते. त्याने चेंडू टाकण्यापूर्वी तो कुठे चेंडू टाकणार हे त्याने राहुलला सांगितले होते. त्यामुळे तो ही तयार होता. आणि मग पुढचं काम विराटने चोख केलं. मी रोहीतशीही या बळीबद्दल बोललो आहे. पॉवरप्लेमध्ये विराटच्या गोलंदाजीचा उपयोग होईल. त्याच्या चेंडूंना चांगला स्विंग आहे,’ असं म्हांब्रे म्हणाले.
(हेही वाचा Ind vs NZ Preview : भारताला घ्यायचाय २०१९ च्या उपान्त्य लढतीचा बदला)
The story of three offies & a “wrong footed in-swinging menace” in Bengaluru courtesy bowling coach Paras Mhambrey 😃👌#TeamIndia | #CWC23 | #MenInBlue | #INDvNED
WATCH 🎥🔽 – By @28anand
— BCCI (@BCCI) November 13, 2023
मधल्या षटकांमध्ये विराटने आपला प्रभाव यापूर्वीही दाखवला आहे. आता म्हांब्रे यांना विराटला शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करताना बघायचं आहे. उजव्या हाताने खेळणाऱ्या फंलदाजांना चकवण्यासाठी विराटकडे तीक्ष्ण यॉर्करचं हत्यार आहे, असं त्यांना वाटतं.
विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही नियमितपणे गोलंदाजी केलेली नाही. पण, त्याच्या नावावर चार बळी आहेत. २०१६ मध्ये टी-२० सामन्यांत त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय बळी मिळवला आहे.
Join Our WhatsApp Community