वॉर्न आणि सायमंड्सच्या मृत्यूमागचा ‘हा’ आहे दुर्दैवी योगायोग

135

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा रविवारी अपघाती मृत्यू झाला. त्याआधी ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू शेन वॉर्न याचाही मार्चमध्ये मृत्यू झाला. या दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंच्या अचानक जाण्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. इतकंच नाही तर जगभरातील क्रिकेटप्रेमींना ही गोष्ट चटका लावणारी होती.

पण या दोन्ही क्रिकेटपटूंच्या मृत्यूमागे दुर्दैवी योगायोग आहे. या दोन्ही क्रिकेटपटूंनी आपल्या मृत्यूच्या आधी माजी क्रिकेटपटूंच्या निधनाबाबत दुःख व्यक्त करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.

(हेही वाचाः RBI ने पाकिस्तानसाठी काम केले, कधी आणि का?)

वॉर्नचं ट्वीट

शेन वॉर्नचे 4 मार्च 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पण आपल्या मृत्यूच्या अवघ्या काही तासांपूर्वी वॉर्नने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांच्याबबात ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. मार्श यांच्या जाण्याची बातमी ऐकून दुःख झाले. ते एक महान खेळाडू होते. त्यांनी अनेक तरुण खेळाडूंना प्रेरणा दिली आहे. रॉड यांना क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंसाठी ते कायमंच आदर्श होते. असं ट्वीट करत शेन वॉर्नने मार्श यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त केलं होतं.

(हेही वाचाः सोसायटींमधील वादांच्या तक्रारींसाठी आता स्वतंत्र पोलिस अधिकारी, पोलिस आयुक्तांची घोषणा)

सायमंड्सने वाहिली श्रद्धांजली

तर सायमंड्सनेही आपल्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी शेन वॉर्नसाठी एक भावनिक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. मी उद्ध्वस्त झालो आहे. मी आता तुम्हाला पुन्हा कधीही भेटू शकत नाही, ही कल्पना मला सहन होत नाही. सर्व वॉर्न कुटुंबाला माझे खूप प्रेम, अशा शब्दांत सायमंड्सने वॉर्नला श्रद्धांजली वाहिली होती. हीच सायमंड्सने शेअर केलेली शेवटची पोस्ट ठरली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.