Commonwealth Games 2022 : चार महिलांनी मिळवले सुवर्ण पदक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू एकामागो एक विक्रम करत आहेत. यात सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदकांची कमाई करत आहेत. आता मंगळवारी, २ ऑगस्ट रोजी लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया व रुपा राणी तिर्की या भारतीय महिलांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत इतिहास घडविला. लॉन बॉल (Lawn Bowls) हा क्रीडा प्रकारात त्यांनी सुवर्ण पदक मिळवले.

भारताकडे एकूण १० पदके झाली

विशेष म्हणजे लॉन बॉल हा क्रीडा प्रकार भारतीयांसाठी अजिबात परिचित नव्हता. मात्र या क्रीडा प्रकारामध्ये या चार महिलांनी सुवर्ण पदक भारताला मिळवून दिले. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कडवा संघर्ष मोडून काढताना १७-१० असा विजय मिळवला. यामुळे आता राष्ट्रकुल स्पर्धेत भारताकडील सुवर्ण पदकांची संख्या चार झाली आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ३ कांस्य अशी एकूण १० पदके झाली आहेत. आफ्रिकेने २-८ अशा पिछाडीवरून १०-८ अशी आघाडी घेतली होती, परंतु अखेरच्या फेरीत भारतीय महिलांनी कडवी झुंज दिली. उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर भारतीय महिलांना सुवर्णपदकाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेच्या तगड्या आव्हानाचा सामना करावा लागला.

(हेही वाचा आता उरलेली शिवसेना दुसरे राऊत संपवणार – दीपक केसरकरांची विनायक राऊतांवर बोचरी टीका)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here