इंग्लंडच्या बर्मिंगहम शहरात कॉमनवेल्थ गेम्स २०२२ पुढील जुलै-ऑगस्ट महिन्यात पार पडणार आहेत. या क्रीडा जगतातील एक मानाच्या भव्य-दिव्य स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंची घोषणा झाली आहे. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या नेतृत्त्वाखाली ३७ खेळाडूंचा चमू इंग्लंडला जाणार आहे.
ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या ३७ खेळाडूंमध्ये १८ महिला असून उर्वरीत पुरुष आहेत. यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू, हिमा दास, दुती चंद अशा खेळाडूंचा समावेश आहे. मागील वेळी कॉमनवेल्थ गेम्स २०१८ मध्ये सुवर्णपदक विजेत्या मेरीने ऐतिहासिक कामगिरी केली होती.
(हेही वाचा चुकीच्या पद्धतीने वाहने उभी केल्याचा फोटो पाठवा ५०० रुपये कमवा!)
चमूमधील खेळाडू
पुरुष खेळाडू : अविनाश साबळे (3000 मी स्टीपलचेस), नितेंदर रावत (मॅरेथॉन), एम. श्रीशंकर आणि मुहम्मद अनिस यहिया (लांब उडी), अब्दुला अबुबकर, प्रवीण चिथ्रवेल आणि एल्डहोस पॉल (ट्रीपल जम्प), ताजिंदरपाल सिंह तूर (शॉटपूट), नीरज चोप्रा, डी.पी. मनू आणि रोहित यादव (भालाफेक), संदीप कुमार आणि अमित खत्री (रेस वॉल्किंग), अमूज जॅकॉब, नोह निर्मल टॉम, अरोकिया राजीव, मुहम्मद अजमल, नागनाथल पंडी आणि राजेश रमेश (4×400 मी रिले).
महिला खेळाडू : एस धनलक्ष्मी (100 मी आणि 4×100 मी रिले), ज्योती याराजी (100 मी हर्डल्स), ऐश्वर्या बी (लांब उडी आणि ट्रिपल जम्प) आणि एन्सी सोजन (लांब उडी), मनप्रीत कौर (शॉटपूट), नवजीत कौर धिल्लोन आणि सीमा पूनिया अंतिल (थाळीफेक), अनु राणी आणि शिल्पा राणी (भालाफेक), मंजू बाला सिंह आणि सरिता रोमित सिंह (हॅमर थ्रो), भावना जाट आणि प्रियंका गोस्वामी (रेस वॉल्किंग), हिमा दास, दुती चंद, सरबनी नन्दा, एमव्ही जिलना आणि एनएस सीमी (4×100 मी रिले)
Join Our WhatsApp Community