राष्ट्रकुल स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेची राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई

महाराष्ट्राच्या अविनाश साबळे याने बर्मिंगहॅममधल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नवा इतिहास रचला आहे. अविनाशने तीन हजार मीटर्स स्टीपलचेस शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात पुरूषांच्या स्टीपलचेस शर्यतीत भारताचे पहिले पदक ठरले आहे. यामध्ये अविनाशने 8 मिनिटं 11.20 सेकंदांची वेळ दिली. त्याचा हा आजवरता नववा राष्ट्रीय विक्रम ठरला. अविनाशने या स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली आहे. अविनाश साबळे हा मूळचा बीडमधील आष्टी तालुक्यातील आहे. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तो भारतीय सेनेत दाखल झाला आहे.

(हेही वाचा – Indian Railway: हिवाळ्यात ट्रेनची AC बंद असते, तरीही रेल्वे त्यासाठी शुल्क आकारते! पण का…?)

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील सन जुआन येथे झालेल्या राउंड रनिंगमध्ये त्यानं 3 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला होता. अविनाश साबळे यानं कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकून एक नवा इतिहास रचला आहे. 3000 मीटर स्टीफलचेस शर्यतीचा अंतिम फेरीत अविनाश साबळे आणि केनियाच्या खेळाडूंमध्ये जोरदार टक्कर झाली. याच खेळाडूंना टफ फाईट देऊन अविनाशनं 8:11:20 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदक जिंकून नवा इतिहास घडवला आहे.

दरम्यान, स्टीपलचेस प्रकारात जागतिक स्पर्धेत अंतिम फेरीत स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला असून त्याने केलेल्या या नव्या विक्रमामुळे आता अविनाशला आशियाई क्रीडा स्पर्धेत 3 हजार मीटर स्टीपलचेस आणि 5 हजार मीटर या दोन्ही प्रकरात उतरवण्याची तयारी सुरू आहे. अविनाशने अमेरिकेत नुकताच धावण्याचा एक रेकॉर्ड देखील मोडीत काढला आहे. सॅन जुआन कॅपिस्टानो येथे झालेल्या साऊंड रनिंग ट्रॅक मीटरमध्ये 5 हजार मीटर शर्यतीत धावून धावपटू बहादूर प्रसाद याने केलेला 30 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here