Commonwealth Games 2030 : भारताला हवे २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धचे यजमानपद

Commonwealth Games 2030 : ३१ मार्च ही यजमानपदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

36
Commonwealth Games 2030 : भारताला हवे २०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धचे यजमानपद
  • ऋजुता लुकतुके

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने २०३० च्या राष्ट्रकुल स्पर्धा भरवण्याचा निर्धार केला आहे. २०२६ च्या स्पर्धा ग्लासगो इथं होणार आहेत आणि या स्पर्धेतून काढून टाकण्यात आलेले सर्व क्रीडाप्रकार राष्ट्रकुल स्पर्धेत पुन्हा समाविष्ट व्हावेत यासाठी भारताचा हा प्रयत्न आहे. कारण, नेमबाजी, कुस्ती, मुष्टीयुद्ध असे प्रकार काढून टाकल्यामुळे भारताची पदकांची संख्या रोडावणार आहे. २०३० च्या स्पर्धेसाठी दावा करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२५ आहे आणि त्यापूर्वी भारताकडून अर्ज करण्यात येणार आहे. (Commonwealth Games 2030)

‘२०३० च्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी अधिकृत अर्ज लवकरच केला जाणार आहे. या स्पर्धेतून काही क्रीडाप्रकार नाहीसे होणार आहेत. तो प्रकार थांबावा, यासाठी भारताचा हा प्रयत्न आहे,’ असं ऑलिम्पिक असोसिएशनच्या सूत्रांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं आहे. ग्लास्गो येथील स्पर्धेतून हॉकी, क्रिकेट, मुष्टियुद्ध, नेमबाजी, कुस्ती आणि बॅडमिंटन हे प्रकार वगळण्यात आले आहेत. याच खेळात भारताला पदकांची चांगली आशा आहे. (Commonwealth Games 2030)

(हेही वाचा – Champions Trophy, Ind vs Pak : आखातात रंगलेल्या ५ भारत-पाक रंगतदार लढती)

ग्लास्गो शहरात फक्त ४ मैदानांवर मिळून राष्ट्रकुल स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे खर्च आणि मैदानांची उपलब्धता यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला होता. २०२२ मध्ये भारताने राष्ट्रकुल स्पर्धेतून वगळलेले नेमबाजी आणि तिरंदाजी हे प्रकार भारतात भरवण्याची तयारी दाखवली होती. पण, कोव्हिडमुळे ते शक्य झालं नव्हतं. (Commonwealth Games 2030)

राष्ट्रकुल खेळांच्या आयोजनाबरोबरच भारताला २०३६ चं ऑलिम्पिक यजमानपदंही हवं आहे. गेल्यावर्षीच भारताने त्यासाठीचा अर्ज केला आहे आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या निवडणुका मार्च महिन्यात झाल्यानंतर ऑलिम्पिक यजमानपदाची प्रक्रिया पुढे सुरू होणार आहे. (Commonwealth Games 2030)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.