देशाला पहिले खोखो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या संघाचे DCM Ajit Pawar यांच्याकडून अभिनंदन

46
देशाला पहिले खोखो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या संघाचे DCM Ajit Pawar यांच्याकडून अभिनंदन
देशाला पहिले खोखो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या संघाचे DCM Ajit Pawar यांच्याकडून अभिनंदन

नवी दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या जागतिक अजिंक्यपद खोखो स्पर्धेत भारतीय पुरुष व महिला संघांनी दमदार कामगिरी करत विश्वविजेतेपद मिळवले आहे. या ऐतिहासिक यशानंतर उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी यांचे अभिनंदन केले. (DCM Ajit Pawar)

(हेही वाचा- Stars in Ranji Trophy : बीसीसीआयच्या दणक्यानंतर रोहित, रिषभ सह हे स्टार खेळाडू खेळणार रणजी सामना )

विशेषतः भारतीय पुरुष संघाचे कर्णधार प्रतिक वाईकर आणि महिला संघाची कर्णधार प्रियांका इंगळे हे दोघेही महाराष्ट्राचे असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघांनी नेत्रदीपक कामगिरी केली. पुण्याचा प्रतिक वाईकर आणि बीडची प्रियांका इंगळे यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करताना अजित पवार म्हणाले, “ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाने देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्ज्वल केले आहे.” (DCM Ajit Pawar)

अंतिम सामन्यात भारतीय संघांनी नेपाळवर एकतर्फी विजय मिळवत दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदक पटकावले. पुरुष संघात कर्णधार प्रतिक वाईकर यांच्यासह महाराष्ट्राचे सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले आणि रामजी कश्यप या पाच खेळाडूंनी चमकदार खेळ केला. तर महिला संघात कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड आणि वैष्णवी पवार या चार महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आपले कौशल्य सिद्ध केले. (DCM Ajit Pawar)

(हेही वाचा- Maha Kumbh 2025: संगमात स्नान करणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला; महाकुंभात स्नान करणाऱ्यांची संख्या ८.२६ कोटींपेक्षा जास्त)

याशिवाय, पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक प्राचीताई वाईकर आणि फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांचेही अजित पवार यांनी विशेष अभिनंदन केले. त्यांनी सर्व खेळाडूंना भविष्यातील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत म्हटले, “हा विजय भारतीय खोखोसाठी मैलाचा दगड ठरेल. आगामी काळात या खेळाला जागतिक स्तरावर अधिक मोठे व्यासपीठ मिळेल.” (DCM Ajit Pawar)

भारतीय संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे देशभरात आनंदोत्सव साजरा होत असून, महाराष्ट्रातील खेळाडूंच्या योगदानामुळे राज्यात क्रीडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी नवीन उमेद निर्माण झाली आहे. (DCM Ajit Pawar)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.