Cricket Fielding Positions : क्रिकेटमधील क्षेत्ररक्षकांच्या जागा समजून घ्या

Cricket Fielding Positions : क्रिकेटमध्ये मैदानावर क्षेत्ररक्षक कसे तैनात केले जातात याचा लेखाजोखा

307
Cricket Fielding Positions : क्रिकेटमधील क्षेत्ररक्षकांच्या जागा समजून घ्या
Cricket Fielding Positions : क्रिकेटमधील क्षेत्ररक्षकांच्या जागा समजून घ्या
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेट हा भारतातील सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे. त्यामुळे या खेळाविषयीची बरीचशी माहिती चाहत्यांना असतेच. स्टेडिअमची मापं, फलंदाजांनी खेळलेले विशिष्ट फटके आणि अगदी गोलंदाजीचे प्रकार हे ही अनेकांना ठाऊक असतात. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ही क्रिकेटची तीन अंग आहेत. एकावेळी एक संघ फलंदाजी करत असेल तर दुसरा संघ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करत असतो. गोलंदाजी करणाऱ्या संघासमोरचं आव्हान असतं कमीत कमी धावांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला गुंडाळण्याचं. आणि त्यासाठी सुयोग्य जागी क्षेत्ररक्षक पेरणं महत्त्वाचं ठरतं. कारण, क्षेत्ररक्षकांनी चेंडू अडवायचा असतो किंवा टप्पा न पडता पकडायचा असतो. यातूनच फलंदाज बाद होत असतो. (Cricket Fielding Positions)

(हेही वाचा- K. K. Muhammed: मुस्लिमांनी काशी, मथुरा सोडावी – ज्येष्ठ पुरातत्त्वशास्त्रज्ञ के. के. मोहम्मद)

क्रिकेटमधील फलंदाजांच्या विविध फटक्यांचा अभ्यास करून चेंडू कुठल्या जागी टोलवला जाऊ शकतो याचा अंदाज बांधत तज्जांनी काही क्षेत्ररक्षणाच्या जागा ठरवल्या आहेत. आणि यात कल्पक कर्णधार किंवा गोलंदाज आपल्या खेळातील कौशल्यानुरुप बदलही करू शकतात. पण, रुढार्थाने ठरलेल्या क्षेत्ररक्षणाच्या जागा इथं समजून घेऊया. (Cricket Fielding Positions)

फलंदाज उजव्या हाताने खेळत असेल तर त्याच्या उजव्या बाजूचं अर्धमैदान हे ऑन साईड म्हणून ओळखलं जातं. आणि डाव्या बाजूचं अर्ध मैदान असतं ऑन किंवा लेग. डावखुऱ्या खेळाडूसाठी ऑन आणि ऑफ दिशा अर्थातच विरुद्ध होतात. फलंदाज पवित्रा घेतो तिथपासूनचं क्षेत्ररक्षणाचं अंतर महत्त्वाचं असतं. क्षेत्ररक्षक अगदी जवळ असेल तर ती जागा ‘सिली’ (इथं क्षेत्ररक्षकाला सुरक्षा पॅडही वापरावं लागतं) (Cricket Fielding Positions)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणूक काळात अवैध मार्गाने होणाऱ्या वाहतुकीवर नजर, ३ ठिकाणी नाकाबंदी; २१ दिवसांत किती मुद्देमाल जप्त? वाचा सविस्तर)

शॉर्ट – सिलीपेक्षा थोडं दूर. पण, तरीही फलंदाजापासून चेंडूचा झेल घेण्या इतपत जवळ  (Cricket Fielding Positions)

मिड – खेळपट्टी आणि सीमारेषा यांच्या मधोमध. मैदान गोलाकार असल्यामुळे ३० यार्ड वर्तुळावर कुठेही क्षेत्ररक्षक असेल तर तो मि़ड  (Cricket Fielding Positions)

लाँग/डीप – जवळ जवळ सीमारेषेजवळ किंवा फलंदाजापासून खूप दूर. इथं फलंदाजाने हवेत उंच मारलेला फटका झेलण्याची तयारी ठेवावी लागते. किंवा अनेकदा चेंडू अडवण्याची भूमिका असते. (Cricket Fielding Positions)

(हेही वाचा- CRIME: कर्नाटकात निवडणुकीपूर्वी पोलिसांची कारवाई, ५ कोटी रोख, 106 किलो दागिने जप्त)

३६० अंशात मैदानाचा विचार करता फलंदाज ज्या दिशांना आणि कोनात फटके मारतो त्यावरूनही क्षेत्ररक्षकांची जागा ठरत असते. असे कोन आहेत, (Cricket Fielding Positions)

स्केअर – फलंदाज खेळपट्टीवर उभा असतो ती डाव्या – उजव्या हाताची सरळ काल्पनिक रेषा.  (Cricket Fielding Positions)

बॅकवर्ड – स्केअरच्या आणि फलंदाजाच्या मागे

फॉरवर्ड – स्केअर आणि फलंदाजाच्या पुढे

फाईन – फलंदाजाच्या मागे पण, यष्टीरक्षकाच्या जवळून

वाईड – स्केअरच्या मागे. पण, यष्टीरक्षकापासून थोडं दूर

(हेही वाचा- Gudhipadva 2024: गुढीपाडव्यानिमित्त मुंबई- ठाण्यातील वाहतुकीत मोठे बदल; जाणुन घ्या पर्यायी मार्ग)

संघात ११ खेळाडू असतात. आणि यातील एक गोलंदाजी तर आणखी एक यष्टीरक्षण करणार असतो. त्यामुळे क्षेत्ररक्षकाची व्यूहरचना करण्यासाठी कर्णधाराकडे ९ जागा शिल्लक असतात. आणि तेवढ्याच एखाद्या कर्णधाराला विशिष्ट वेळी वापरता येतात. फलंदाजाला एखादा विशिष्ट फटका मारायला उद्‌युक्त करणं आणि तसं करताना त्याला चकवून झेल देण्यास भाग पाडणं हे गोलंदाज आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचं कसब आहे. क्षेत्ररक्षणाच्या जागांचे तीन ढोबळ वर्गीकरण आहे. (Cricket Fielding Positions)

क्लोज इन-फिल्ड – फलंदाजाच्या अगदी जवळचे क्षेत्ररक्षक. यांची नियुक्ती ही खास करून झेल पकडण्यासाठी केलेली असते. फलंदाजांच्या अगदी जवळ हे क्षेत्ररक्षक उभे असतात. स्लिप, सिली पॉइंट, शॉर्ट लेग अशा काही जागा या क्लोज इन-फिल्डच्या आहेत. (Cricket Fielding Positions)

इनफिल्ड – खेळपट्टीपासून ३० यार्डांवर एक वर्तुळ आखलेलं असतं. या वर्तुळाच्या आत असलेले क्षेत्ररक्षक हे इन-फिल्ड क्षेत्ररक्षक असतात. एकतर झेल पकडणं किवा एकेरी, दुहेरी धावा थांबवणं ही त्यांची जबाबदारी असते. (Cricket Fielding Positions)

(हेही वाचा- Turdal Expensive: तूरडाळीला अवकाळी पावसाचा फटका, दरवाढीमुळे ग्राहकांचे बजेट कोलमडणार; वाचा नवीन दरवाढ)

आऊटफिल्ड – सीमारेषेवर उभे असलेले क्षेत्ररक्षक हे आऊटफिल्ड क्षेत्ररक्षक असतात. त्यांना उंच उडालेले झेल थांबवायचे असतात. तसंच चौकारही अडवायचे असतात. (Cricket Fielding Positions)

फलंदाजाने चेंडू खेळल्यानंतर त्याचा कोन आणि दिशा पाहता मैदानावरील काही महत्त्वाच्या आणि मोक्याच्या जागा तज्जांनी निश्चित केल्या आहेत. विशिष्ट प्रकारे फटका मारल्यावर तो या जागांवर जाण्याची शक्यता सर्वाधिक असते. त्यावरून पडलेल्या क्षेत्ररक्षणाच्या जागा पाहूया, (Cricket Fielding Positions)

(हेही वाचा- World Biggest Cricket Stadium : जगातील सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडिअम विषयी ५ रंजक गोष्टी)

यष्टीरक्षक, स्लिप (या १ ते ५ ही असू शकतात), गली, सिली पॉइंट, पॉइंट, डीप पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट, डीप बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट थर्ड, डीप थर्ड, शॉर्ट लेग, स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लाँग लेग, शॉर्ट फाईन लेग, डीप फाईन लेग, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, लाँग ऑफ, मिड – ऑन, लाँग ऑन, मिड विकेट, डीप मिड विकेट (Cricket Fielding Positions)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.