रोहित शर्मापासून ते रिकी पाॅंटिंगपर्यंत कोहलीने मोडले अनेक ‘विराट’ विक्रम

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. त्याने टी- 20 आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावले. या शतकासोबतच विराटचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले 71 वे शतके ठरले. त्याने 61 चेंडूत 12 चौकार आणि 6 षटकांसह नाबाद 122 धावा केल्या. या शतकी खेळीसह विराट कोहलीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पाहूयात कोहलीचे विराट विक्रम…

रोहित- राहुलचा विक्रम मोडला

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीने अफगाणिस्तानविरोधात शतकी खेळी करत, राहुल आणि रोहित यांचा विक्रम मोडला आहे. विराटने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावा करत रोहितला मागे टाकले आहे. विराटने 122 धावांची खेळी केली आहे. याआधी रोहित शर्माच्या नावावर 118 धावांची खेळी होती. राहुलच्या 110 धावांच्या शतकी खेळीचा विक्रमही विराट कोहलीने मोडला आहे. आता विराट कोहलीच्या नावावर भारताकडून सर्वोच्च धावसंख्या उभारण्याचा विक्रम आहे.

मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडला

विराट कोहलीने वादळी शतक झळकावत मार्टिन गप्टिलचा विक्रम मोडीत काढला आहे. मार्टिन गप्टिलच्या नावार 3500 धावा आहेत. विराट कोहलीच्या नावावर 3584 धावा झाल्या आहेत. आंतरराष्ट्री क्रिकेटमध्ये 3500 पेक्षा जास्त धावा करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50+ धावा करणारा फलंदाज

माजी कर्णधार विराट

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक वेळा 50+ धावा करण्याचा विक्रम केला आहे. विराट कोहलीने रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला. विराट कोहलीने 33 वेळा 50+ पेक्षा जास्त धआवा केल्या आहेत.

24 हजार धावांचा विक्रम

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने सर्वात वेगवाग 24 हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. याआधी सचिव तेंडुलकरने वेगवान 24 हजार धावांचा विक्रम केला होता.

भारताकडून शतक झळकवणारे फलदांज

टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा विराट कोहली सहावा फलंदाज ठरला आहे. याआधी रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना, दीपक हुड्डा आणि सुर्यकुमार यादव यांनी शतक झळकावली आहेत. रोहित शर्माने टी-20 मध्ये भारताकडून सर्वाधिक चार शतके झळकावली आहेत. त्यानंतर राहुलच्या नावावर दोन शते आहेत.

आशिया चषकात सर्वाधिक धावा

आशिया चषकात सर्वाधिक धावा चोपणा-या फलंदाजामध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर आहे. विराट कोहलीने दोन अर्धशतक आणि एक शतक झळकावत यंदा आशिया चषकात सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. त्याशिवाय, 2012, 2016 मध्येही विराट कोहलीने भारताकडून आशिया चषकात सर्वाधिक धावा केल्या होत्या.

पाॅंटिंगच्या विक्रमाशी बरोबरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणा-ाय यादीत विराट कोहली दुस-या क्रमांकावर पोहचला आहे. विराट कोहलीच्या आधी सचिन तेंडुलकरचा क्रमांक लागतो. विराट कोहलीने पाॅंटिंगच्या 71 शतकांची बरोबरी केली आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 शतकांची नोंद आहे. दुस-या क्रमांकावर असणा-या विराट कोहलीच्या नावावर 71 शतकांची नोंद आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here