Cricket in Asian Games? आशियाई खेळांत क्रिकेटच्या समावेशासाठी आशियाई ऑलिम्पिक परिषद उत्सुक

२०२६ च्या जपानमधील स्पर्धेत तरी क्रिकेटच्या समावेशाची शक्यता आहे. 

155
Bizarre Cricket Rule : ‘या’ स्पर्धेत षटकार ठोकण्यालाच आहे बंदी
  • ऋजुता लुकतुके

आशिया ऑलिम्पिक परिषदेला २०२६ च्या आशियाई क्रीडास्पर्धेतही क्रिकेटचा समावेश करायचा आहे. आणि त्यासाठी नागोयामधील एक बेसबॉल स्टेडिअम क्रिकेटच्या मैदानात बदलण्याचीही त्यांची तयारी आहे. क्रिकेटच्या प्रशासकांनीही मल्टी स्पोर्ट्स स्पर्धांमध्ये क्रिकेटच्या प्रसाराचा प्रयत्न सुरू केला आहे. आणि २०२८ च्या लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा शिरकावही झाला आहे. आता आयसीसीसमोर पुढील आव्हान आहे ते आशियाई स्तरावर तरी कायमस्वरुपी क्रिकेटची वर्णी लावण्याचं. (Cricket in Asian Games?)

त्यासाठी आशियाई ऑलिम्पिक परिषदेची मान्यता त्यांना मिळाली आहे. गेल्यावर्षी चीनच्या होआंगझाओ इथं झालेल्या स्पर्धेत क्रिकेट होतं. पण, त्या आधीच्या जकार्ता आणि पालेंमबँग इथं क्रिकेट खेळवलं गेलं नाही. ‘आम्ही अजून टोकयो स्पर्धेचा कार्यक्रम आखत आहोत. तो तयार झालेला नाही. आणि क्रिकेटच्या समावेशासाठी आम्ही उत्सुक आहोत,’ असं आशियाई परिषदेचे सचिव रणधीर सिंग यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. (Cricket in Asian Games?)

(हेही वाचा – C. S. Seshadri : बीजगणितीय भूमितीमध्ये विपूल संशोधन करणारे भारतीय गणितज्ञ सी. एस. शेषाद्री)

बेसबॉल मैदानाला क्रिकेट मैदानात बदलण्यावर विचार सुरू

पुढील आशियाई स्पर्धा २०१६ मध्ये जपानच्या टोकयो शहरात होणार आहेत. आणि जगातील या मोठ्या शहरात नेमकं एकही क्रिकेटचं मैदान नाही. सध्या तिथल्या बेसबॉल मैदानाला क्रिकेट मैदानात बदलण्यावर विचार सुरू आहे. पण जपानमध्ये जपान क्रिकेट असोसिएशन ही संस्था अस्तित्वात आहे. आणि त्यांचीही आयोजनाची तयारी आहे. (Cricket in Asian Games?)

आशियाई खेळांसाठी निश्चित केलेल्या मुख्य स्टेडिअमपासून नागोयामधील हे स्टेडिअम साडेतीन तास दूर आहे. तोगिची स्टेडिअम असं त्याचं नाव असून तिथेच क्रिकेटच्या सुविधा उभारण्यावर विचार सुरू आहे. तसं झालं तर जपानकडूनही स्पर्धेत क्रिकेटच्या समावेशाचा प्रस्ताव येऊ शकतो. अर्थात, ऑलिम्पिक परिषदेच्या सर्व सदस्य देशांची मान्यता या प्रस्तावाला मिळणं आवश्यक आहे. (Cricket in Asian Games?)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.