- ऋजुता लुकतुके
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीसाठी स्वीत्झर्लंडच्या लुसानमध्ये दाखल झाले आहेत. क्रिकेट खेळाचा समावेश २०२८ च्या लॉस एंजलीस ऑलिम्पिक खेळांमध्ये झाला आहे. आता ऑलिम्पिक चार्टरमध्ये क्रिकेटचा समावेश नियमितपणे व्हावा आणि क्रिकेटचा जागतिक विस्तार व्हावा असा आयसीसीचा प्रयत्न असणार आहे. त्या दृष्टीने शाह आयओसीच्या सदस्य देशांशी गाठीभेटी घेणार आहेत. (Cricket in Olympics)
गेल्या महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी मालिका सुरू असताना शाह ब्रिस्बेनला आले होते. तिथे २०३२ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी त्यांनी मोहीम सुरू केली आहे. ब्रिस्बेन ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष सिंडी हूक आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष नीक हॉकली यांच्याबरोबर त्यांनी याविषयी सविस्तर चर्चा केली आहे. त्यानंतर जय शाह यांनी एक ट्विट केलं होतं. (Cricket in Olympics)
(हेही वाचा – देशाला पहिले खोखो विश्वविजेतेपद जिंकून देणाऱ्या संघाचे DCM Ajit Pawar यांच्याकडून अभिनंदन)
Very exciting time ahead for Cricket’s involvement in the Olympics movement – a meeting with the @Brisbane_2032 organizing committee in Brisbane, Australia today.@ICC | @Olympics | @CricketAus | @BCCI | #brisbane2032 pic.twitter.com/JVyMbkCYrz
— Jay Shah (@JayShah) December 12, 2024
जय शाह यांनी या भेटीत वार्ताहर कक्षालाही भेट दिली. आणि सुनील गावस्कर यांच्याबरोबर क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील समावेशाविषयी माहिती दिली. २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशातही बीसीसीआयचे सचिव म्हणून जय शाह यांचा मोठा हात आहे आणि आयसीसीचे अध्यक्ष म्हणून कारभार हाती घेतानाही त्यांनी क्रिकेटच्या विस्ताराचं स्वप्न बोलून दाखवलं होतं. आताही ते पाठपुरावा करताना दिसत आहेत. (Cricket in Olympics)
कारण, येत्या ३० जानेवारीला ऑलिम्पिक समितीची एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि तिथे क्रिकेटचा विषय पुढे घेऊन जाण्याचा जय शाह यांचा प्रयत्न असेल. आयसीसीचे अध्यक्ष म्हणून ते या परिषदेला हजर राहतील. (Cricket in Olympics)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community