Cricket in Olympics : ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटवरील चर्चासत्रात राहुल द्रविडचा सहभाग

Cricket in Olympics : पॅरिसमध्ये इंडिया हाऊस इथं क्रिकेटमधील नवीन पर्वाची सुरुवात असं एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे 

114
Cricket in Olympics : ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटवरील चर्चासत्रात राहुल द्रविडचा सहभाग
Cricket in Olympics : ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटवरील चर्चासत्रात राहुल द्रविडचा सहभाग
  • ऋजुता लुकतुके

आगामी २०२८ च्या लॉस एंजलीस ऑलिम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा समावेश झाला आहे. त्याचाच आनंद साजरा करण्यासाठी आताच्या ऑलिम्पिक नगरीत अर्थात, पॅरिसमध्ये एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. ‘ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश : क्रिकेटमध्ये एका नवीन पर्वाची सुरुवात,’ असा या चर्चासत्राचा विषय आहे. इंडिया हाऊस इथं २८ जुलैला संध्याकाळी साडेसहा वाजता हे चर्चासत्र होणार आहे. (Cricket in Olympic)

(हेही वाचा- Paris Olympic 2024 : भारतीय खेळाडूंना मिळालेल्या अधिकृत किटमध्ये काय काय आहे?)

यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक देशासाठी अशा जागा नेमून देण्यात आल्या आहेत. तिथे हे देश त्यांचा टीव्ही स्टुडिओ किंवा इतर व्यवस्था उभारू शकतात. ऑलिम्पिकच्या निमित्ताने पॅरिसमध्ये आलेले खेळाडू व इतर लोकांना एकत्र आणणं, त्यांच्यात संवाद घडवून आणणं सोपं जावं, यासाठी अशा जागेचा उपयोग करता येऊ शकतो. भारतात ऑलिम्पिक स्पर्धेचं प्रसारण करणाऱ्या रिलायन्स जिओ कंपनीचा स्टुडिओ इथंच आहे. (Cricket in Olympic)

रिलायन्स फाऊंडेशन आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. राहुल द्रविड (Rahul dravid) बरोबरच आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ ॲलरडाईस, ड्रीम स्पोर्ट्सचे सहसंस्थापक हर्ष जैन यांचाही या चर्चासत्रात सहभाग असणार आहे.  (Cricket in Olympic)

(हेही वाचा- महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पासाठी 15,554 कोटी Ashwini Vaishnaw यांची माहिती )

राहुल द्रविडच्या (Rahul dravid) मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषकात अंतिम फेरी गाठली. तर टी-२० विश्वचषकही नुकताच जिंकला आहे. तर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये राहुल द्रविड हे चर्चेत असलेलं एक दिग्गज व्यक्तिमत्त्व आहे. (Cricket in Olympic)

ऑलिम्पिकमधील समावेशानंतर या खेळासमोरची इतरही जागतिक आव्हानांवर या चर्चासत्रात चर्चा होणार आहे. (Cricket in Olympic)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.