ऋजुता लुकतुके
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावाची जादू क्रिकेट खेळणाऱ्या देशांमध्ये तर चालतेच. शिवाय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक (Cricket in Olympics) परिषदेच्या मुंबईत झालेल्या वार्षिक बैठकीतही विराटच्या नावाची चर्चा झाली. इतकंच नाही तर क्रिकेटच्या ऑलिम्पिकमध्ये समावेशासाठी विराटची जागतिक प्रतिमा उपयोगी पडली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराटच्या नावावर २५,००० पेक्षा जास्त धावा आहेत. ७७ शतकं त्याच्या नावावर आहेत. आणि क्रिकेटपटू म्हणून संघाचा कर्णधार म्हणून अनेक संस्मरणीय क्षण त्याने जगाला दिले आहेत. त्यामुळे त्याची लोकप्रियताही अफाट आहे.
विराटच्या या लोकप्रियतेचा उल्लेख लॉस एंजलिस ऑलिम्पिक (Cricket in Olympics) खेळांच्या आयोजन समितीचे क्रीडाविषयक अध्यक्ष निकोलो कँप्रियानी यांनी गौरवाने केला. ‘माझा मित्र विराट कोहलीचे सोशल मीडियावर ३४० दशलक्षांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. क्रीडा जगतातील तो तिसरा मोठा सोशल मीडिया स्टार आहे. अशा क्रिकेटचा समावेश ऑलिम्पिक २०२८ मध्ये झाला तर आमच्यासाठी ही विन-विन सिच्युएशन आहे. क्रिकेटलाही विस्ताराची संधी मिळेल,’ असं कँप्रियानी बैठकीत बोलताना म्हणाले.
विराटचा आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लगेच विराटविषयी एक ट्विट करून ही माहिती सर्वांना दिली. विराट फक्त भारताचाच क्रिकेट आयकॉन नसून जगाचा आयकॉन बनला आहे, असं त्यांनी म्हटलंय.
𝐊𝐎𝐇𝐋𝐈𝐅𝐈𝐄𝐃! ✍️
The Face and the Brand, not just for RCB or Team India, but for Cricket as a sport too! 🙌 👑
Sports Director at #LA28 explains why it’s a win-win to have Cricket at the #Olympics. 🤝 #PlayBold pic.twitter.com/x2JJa7ALyZ
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) October 16, 2023
१२८ वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेट ऑलिम्पिकचा भाग असणार आहे. यंदा कसोटी नाही तर टी-२० क्रिकेट ऑलिम्पिकमध्ये खेळवलं जाईल. २०१८ मध्ये विराट कोहली ३९ वर्षांचा असेल. त्यामुळे या ऑलिम्पिकमध्ये तो खेळू शकेल का हा प्रश्नच आहे. पण, त्याच्या लोकप्रियतेचा असाही फायदा क्रिकेटला झाला आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही ऑलिम्पिक समावेशानंतर ट्विट करून आनंद व्यक्त केला आहे.
Join Our WhatsApp CommunityAfter a wait of more than a century, our beloved sport is back on the Olympic stage at @LA28. This marks the dawn of a new era for cricket as it will be a golden opportunity to foster inclusivity and showcase new talent from emerging cricketing nations. A start of something truly… https://t.co/Y4o2Zp5gl7
— Sachin Tendulkar (@sachin_rt) October 16, 2023