तब्बल १२८ वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याला ‘आयओसी’कडून मंजुरी देण्यात आली आहे. २०२८ च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतची घोषणा सोमवारी करण्यात आली.
क्रिकेट सोबतच बेस बॉल, सॉफ्ट बॉल, फ्लॅग फुटबॉल लॅक्रॉसे आणि स्क्वॉश खेळांचा देखील समावेश करण्यासाठी समितीने परवानगी दिली आहे. (International Olympics )
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार झाली. त्यानुसार आता पासून ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. लॉस एंजेलिसमध्ये २०२८ साली ऑलिम्पिकचं आयोजन करण्यात आलं आहे. क्रिकेटसोबत यात फ्लॅग फुटबॉल, बेसबॉल, सॉफ्टबॉल, लेक्रोस आणि स्क्वॅश या खेळांचाही समावेश करण्यात आला आहे. (International Olympics )
क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाचं घोडं हे वाडा आणि बीसीसीआय यांच्यातील वादामुळे अडलं होतं.अखेर बीसीसीआय आणि आयसीसीने २०१६ मध्ये अँटी डोपिंगची जागतिक संघटना वाडाच्या धोरणांचा स्विकार केला. आता महिला क्रिकेट देखील प्रसिद्ध होऊ लागलं आहे. त्यामुळे क्रिकेटच्या ऑलिम्पिक समावेशाचा मार्ग मोकळा झाला.
(हेही वाचा : Afghanistan Stuns England : ‘याक्षणी क्रिकेट ही एकमेव गोष्ट देशवासीयांना आनंद देतेय’)
गेली राष्ट्रकुल स्पर्धा आणि नुकतीच झालेल्या एशियन गेम्समध्ये क्रिकेटचे पुनरागमन झाले. राष्ट्रकुल स्पर्धेत फक्त महिला क्रिकेटचा समावेश होता. तर एशियन गेम्समध्ये पुरूष क्रिकेट आणि महिला क्रिकेट दोन्हीचा समावेश होता. भारतीय महिला आणि पुरूष संघाने सुवर्ण पदक पटकावले.
हेही पहा –