Cricket Kit : क्रिकेटमधील ५ सर्वोत्तम किट्स कुठली?

Cricket Kit : क्रिकेट किट्सची किंमत किती आणि चांगलं किट कसं ठरवायचं?

174
Cricket Kit : क्रिकेटमधील ५ सर्वोत्तम किट्स कुठली?
Cricket Kit : क्रिकेटमधील ५ सर्वोत्तम किट्स कुठली?
  • ऋजुता लुकतुके

भारतीयांना असलेल्या क्रिकेटच्या वेडाविषयी वेगळं सांगायला नको. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या सुटीत सगळीकडे क्रिकेट प्रशिक्षणाचे वर्ग अगदी नव्या जोमाने सुरू होतील. पण, खेळ म्हटलं की दुखापतीचा धोका, पडझडीची भीतीही आलीच. त्यामुळे क्रिकेटसाठी वापरायचं किट हे चांगल्या दर्जाचं आणि मुलांना सुरक्षित ठेवेल असं हवं. त्या दृष्टीने बाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या ब्रँड आणि सुरक्षित किटचा समावेश या लेखात केला आहे. (Cricket Kit)

(हेही वाचा- Weather Update: महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज)

बॅट, चेंडू, हेलमेट, पॅड्स, ग्लव्हज, आर्मगार्ड आणि इतर काही गार्डचा समावेश किटमध्ये होत असतो. किट खरेदी करताना त्याचा दर्जा, टिकाऊपणा, सुयोग्य आकार, वेगवेगळ्या प्रकारच्या जर्सी, ब्रँड आणि किंमत बघून कुठलं किट घ्यायचं हे ठरवलं जातं. सध्या भारतात उपलब्ध असलेली पाच सर्वोत्तम किट्स बघूया, (Cricket Kit)

एसक्यू स्पोर्ट्स ग्रँड एडिशन व्हीके किट – यातील व्हीके म्हणजे विराट कोहली. त्याचा खेळ बघून हे किट तयार करण्यात आलं आहे. तसा कंपनीचा दावाच आहे. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत विविध मापांत हे किट उपलब्ध आहे. यातील क्रिकेटची बॅट ही उच्च दर्जाची असल्याचं बोललं जातं. बॅट बरोबर चांगले ग्लव्ह्ज आणि सुरक्षेसाठी सगळ्या प्रकारची गार्ड यात आहेत. किटबरोबर येते एक आकाराने मोठी किट बॅग. आणि किटची किंमत ४,१८५ रुपयांपासून सुरू होते. (Cricket Kit)

(हेही वाचा- Antop Hill Firing : अँटॉप हिल गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला डोंबिवलीतून अटक)

एसजी फुल क्रिकेट किट – एसजी हा क्रिकेटमधील आतापर्यंतचा एक जुना आणि लोकप्रिय ब्रँड आहे. त्यामुळे किटची किंमतही तशीच आहे. पण, किटचा दर्जा हा चांगला आणि टिकाऊ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे किट ऑनलाईनही विक्रीसाठी उपलब्ध आहे. आणि किटबरोबरच नंतर दुरुस्तीसाठी चांगली सेवा देण्याचा कंपनीचा लौकिक आहे. या किटची किंमत सुरू होते ७,२५० रुपयांपासून. (Cricket Kit)

सीडब्ल्यू क्रिकेट किट – सीडब्ल्यू कंपनीचं बुलेट किट हे खेळाडूंमध्ये जास्त लोकप्रिय आहे. किटमधील बॅट ही काश्मीरमधील लाकडापासून बनवलेली असते. आणि बॅट बरोबरच ग्लव्ह्जवरही कंपनीने विशेष मेहनत घेतली आहे. आणि खासकरून लेदरबॉल क्रिकेटसाठी हे किट बनलेलं आहे. त्यामुळे खेळाडूची सुरक्षा हा या किटचा युएसपी आहे. या किटची किंमत ५,२७५ रुपयांपासून सुरू होते. (Cricket Kit)

(हेही वाचा- Cricket Jersey Design : क्रिकेट जर्सीतील कुठल्या गोष्टी जर्सीला विजेत्याचा लुक देतात?)

क्लाप प्रॅक्टिस क्रिकेट किट – क्लापचं हे किट नावाप्रमाणेच सरावासाठी आणि फलंदाजाला मोठ्या सामन्यांसाठी तयार करणारं आहे. आणि विशेष म्हणजे या किटमध्ये तीन यष्ट्याही येतात. त्यामुळे घरी किंवा गल्लीत खेळतानाही याचा उपयोग होऊ शकेल. शिवाय किटमध्ये एक टेनिस बॉलही येतो. आणि किट टेनिसबॉल सरावासाठी असलं तरी बॅटच्या दर्जात कंपनीने कसलीही तडजोड केलेली नाही. त्यामुळे हे किटही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. याची किंमत आहे १,३९९ रुपये (Cricket Kit)

(हेही वाचा- Lok Sabha Elections 2024: राहुल गांधींच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे बीआरएसने केली तक्रार, जाणून घ्या काय आहे प्रकरण)

एमपीआरटी वूडन किट – हे किटही लेदरबॉल क्रिकेटसाठी बनवण्यात आलंय. त्यामुळे चांगल्या दर्जाच्या बॅट बरोबरत यात सुरक्षेची काळजीही घेतली गेलीय. यातील हेलमेट हे उच्च दर्जाचं आहे. आणि इतर गार्डबरोबर यात छाती आणि पोटाचं रक्षण करणारं गार्डही आहे. (Cricket Kit)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.