क्रिकेटविश्वातील स्टार फलंदाज विराट कोहली हा विविध करारांद्वारे दररोज दीड कोटी रुपये कमावतो. रेडीएफच्या एका व्यावसायिक वृत्तातून हा खुलासा झाला आहे.
- मिंत्रा, 10 कोटी (2019): बाॅलीवूड, क्रीडा आणि फॅशनशी संबंधित कंपनी मिंत्रामध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघेही भागीदार आहेत.
- एमपीएल: 12 कोटी ( 2019), विराट कोहली हा एमपीएलच्या मूळ कंपनीत गुंतवणूकदार आहे. विराटला 33.32 लाख रुपये कम्पलसरी कनव्हर्टिबल डिबेंचर वितरित करण्यात आले आहेत.
- एमआरएफ: 100 कोटी (2017-2025), बॅटवर लोगो लावण्यासाठी विराट कोहलीला एमआरएफकडून दरवर्षी 12.50 कोटी रुपये दिले जातात.
- ऑडी: 5 कोटी( 2015) विराटने 2015 ला ऑडीसोबत पाच कोटी रुपयांच्या एन्डाॅर्समेंट डीलवर स्वाक्षरी केली होती. 2021 ला विराटने कंपनीसोबत आपल्या कराराचा विस्तार केला. या डीलच्या रकमेचा खुलासा मात्र केलेला नाही.
- प्यूमा: 110 कोटी (2017-2025) एखाद्या ब्रॅंडसोबत 100 कोटींची डील करणारा विराट हा पहिलाच भारतीय खेळाडू आहे. ही डील गेल्या आठ वर्षांपासून सुरु आहे. यासाठी विराटला दरवर्षी जवळपास 13.25 कोटी रुपये दिले जातात.
- आदिदास– 30 कोटी ( 2014-2017)
अन्य उल्लेखनीय करार
गूगल डियो, मॅनिएवर, अमेरिकन टूरिस्टर, विक्स, व्हाॅलिनी, विवो, पेप्सी (2011-2017)
Join Our WhatsApp Community