सध्या पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणी वाढत आहेत. पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी फिरकीपटू अॅश्टन अगरला (Ashton Agar) कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले होते. मंगळवारी अॅश्टन अगर तसेच फिजिओ ब्रेंडन विल्सन यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली होती. या परिस्थितीमुळे ऑस्ट्रेलिया संघाला मैदानात ११ खेळाडू उतरवण्यासाठी कसरत करावी लागली. त्यांच्याकडे पाकिस्तान दौऱ्यासाठी केवळ १३ खेळाडू आहेत.
( हेही वाचा : युक्रेनहून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची वाट खडतर )
प्रमुख खेडाळूंना मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी विश्रांती
केवळ कोरोना संसर्गच नाही तर ऑस्ट्रेलियन संघ दुखापतींशीही झुंज देत आहे. अष्टपैलू मिचेल मार्शला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. तर स्टीव्ह स्मिथ कोपराच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स, जोश हेझलवूड, मिचेल स्टार्क आणि अनुभवी सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांना ऑस्ट्रेलियाने मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी विश्रांती दिली आहे.
2009 मध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नव्हता. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे.
Join Our WhatsApp Community